facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

आवाज न्यूज लाईन

ठाणे : भरजरी चनिया चोली, आरशांनी सजिवलेला घागरा, त्याला साजेसे अलंकार असा शृंगार करून नवरात्रीत मिरविण्यापेक्षा रोजच्या पेहरावालाच नवरात्रीचा टच देण्याकडे यंदा तरुणींचा कल आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत ऑफिस, कॉलेज असे दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याने या ठिकाणी जाताना भरजरी कपड्यांपेक्षा रोजच्या कपड्यांतच वैविध्य आणत उत्सव आणि काम यांचा मेळ पोषाखातून साधला जात आहे.
श्रावणाची सुरुवात झाली की घराघरात उत्सववारे वाहू लागतात. तरुणींसह महिलांचीही खरेदी सुरू होते. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या सणांसाठी विविध पोषाखांची आखणी केली जाते. नवरात्रीत येणाऱ्या नवरंगासाठी कपड्यांची जुळवाजुळव होते. घगरा, चनिया चोली, भरजरी साड्या, त्यावर खुलणारे दागिने अशा वेशभुषा केलेल्या तरुणींनी दांडिया फुलून गेल्याचे चित्र काही काळापूर्वी दिसत असले तरी यंदा मात्र रोजच्याच पेहरावाला तरुणींनी पसंती दिली आहे. नवरात्रीतील नऊ रंगांचे पोषाख परिधान करणे सोपे असले तरी साध्या पोषाखात ते रंग वापरले जातात. नोकरी, कॉलेज अशा रोजच्या ठिकाणी लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना पारंपरिक पोषाख करणे शक्य नसते. त्यामुळे कुर्ती, टॉप, चुडीदार या रोजच्या वापरातील पोषाखांकडेच महिलांचा कल आहे. महिलांची ही गरज लक्षात घेत यंदा बाजारातही अशाच पद्धतीच्या पोषाखांनी गर्दी केली आहे. यामध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांचे कुर्ती, त्यावरील आरशांची नक्षी, हँडप्रिंट केलेले टॉप यांच्यात वैविध्य आहे. पारंपरिक पोषाखांच्या तुलनेत कमी खर्चिक असणारे हे प्रकार कामाच्या ठिकाणी घालणे सहज शक्य आहे, अवघ्या दोनशे रुपयांपासून उपलब्ध असणाऱ्या साध्या टॉप अथवा नक्षीदार कुर्तीचा पर्याय अनेकांना भुरळ घालतो. तसेच नवरात्रीनंतरही ते वापरता येत असल्याने महिलांची अशा कपड्यांना मागणी आहे. नवरात्रीत गरबा अथवा दांडिया खेळतानाही सोयिस्कर ठरणाऱ्या कपड्यांमध्येही याच वस्त्रांना पसंती दिली जात आहे. यामध्ये पायघोळ रंगीत प्लाझो आणि त्यावर डिझायनर टॉप असा पेहराव खरेदी करण्यावर अनेकींचा भर आहे. रंगीत आणि आकर्षक कुर्ती, हँडप्रिंटचे टॉप यांना अधिक पसंती आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *