facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / वाहतूककोंडीवर अंडरपासचा उतारा

वाहतूककोंडीवर अंडरपासचा उतारा

आवाज न्यूज लाईन

ठाणे:कल्याण-शिळ मार्गावर काटई नाक्याजवळ लोढा पलावा येथे क्रॉसिंगमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून या ठिकाणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून अंडरपास करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली असून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला तत्वतः मंजुरी देत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने पालकमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात नुकतेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अंबरनाथ नगरपरिषद, एमआयडीसी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कमी खर्चात आणि जलद वेळेत हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शीट पायलिंग पद्धत उपयोगी ठरेल, असे या बैठकीत मांडण्यात आले. उल्हासनगरमधील खेमाणी नाल्याचे नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या एसटीपीमधील पाणी नंतर नदीत सोडण्यासाठी या पद्धतीचा वापर करता येईल. तसेच उल्हासनगरमधील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे कचऱ्याचे ढीग कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन यासाठीही याच पद्धतीने ढिगाऱ्याभोवती संरक्षक भिंत बंधण्याबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाल्यांचे मजबुतीकरणदेखील याच पद्धतीने करण्याची सूचना याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांनी केली. शिळ-कल्याण रस्त्यावर एमएसआरडीसीच्या माध्यमातून उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. तरी तोपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, काटई नाक्याजवळ लोढा येथे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन तिथे अंडरपास करण्याची मागणीही त्यांनी केली. शीट पायलिंग पद्धतीने हे काम कमी खर्चात आणि वर्षभरात होणार असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री शिंदे यांनी दिले. कल्याण येथील खाडी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाबाबतही चर्चा झाली. कल्याणला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी महापालिकेला दिले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *