facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / क्रीडाजगत / सौरव गांगुली लिफ्टमध्ये अडकला

सौरव गांगुली लिफ्टमध्ये अडकला

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली गुरुवारी इडन गार्डन्स स्टेडियममधील क्लब हाऊसच्या लिफ्टमध्ये अडकला. तब्बल २९ वर्षे जुन्या या लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी गांगुलीला अखेर स्टूलचा आसरा घ्यावा लागला. याच क्लब हाऊसमधील आपल्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात जात असताना दुसऱ्या मजल्याहून खाली येत असताना लिफ्ट अडकली. या लिफ्टला जुन्यापद्धतीचा लोखंडाचा सरकरणारा दरवाजा आहे. गांगुली अडकल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी लागलीच हालचाली करत भारताच्या या माजी कसोटीपटूला अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर काढले. सर्वप्रथमच मुख्य वीजप्रवाह बंद करत, लिफ्टचे दार उघडण्यात आले. मग गांगुली लिफ्टमधील स्टूलावर चढून बाहेर पडला.

गांगुलीच्या किवीजन टिप्स

 भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरतो आहे. स्पिनर्सचा मुकाबला करताना त्यांना अडचणी जाणवत आहेत. यावर तोडगा म्हणून या संघाने गुरुवारी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीशी संवाद साधला. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख गांगुली कोलकाता कसोटीआधी न्यूझीलंडचे फलंदाजीचे प्रशिक्षक क्रेग मॅकमिलनशी चर्चा करताना दिसला. या दोघांसह न्यूझीलंड संघाचा सपोर्ट स्टाफही उपस्थित होता. आपल्या डावखुऱ्या स्टान्ससह गांगुली न्यूझीलंड सपोर्ट स्टाफला ‘व्ही’मध्ये फलंदाजी कशी करावी, याच्या टिप्स देत होता. अशा खेळपट्टीवर चेंडू कसा वळतो, याबाबतही गांगुलीने न्यूझीलंडला सांगितले.

विल्यमसन आजारी

भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाच्या मागील दुखापतींचे सत्र काही केल्या संपण्याचे नावच घेत नाही. गुरुवारी त्यांचा कर्णधार केन विल्यमसनची तब्येत बिघडली अन् यामुळेच त्याने सरावाऐवजी विश्रांती घेणे पसंत केले. तो शुक्रवारी कसोटीआधी फिट होईल व अंतिम संघात भाग घेईल, असा आशावाद न्यूझीलंडचा सलामीवीर केन विल्यमसनने व्यक्त केला. सध्या आयसीसी फलंदाजांच्या कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील विल्यमसन आजारपणामुळे कसोटीला मुकला तर न्यूझीलंडचे मोठे नुकसान होईल. विल्यमसनने पहिल्या कानपूर कसोटीत अनुक्रमे ७५ व २५ धावांची खेळी केली होती.

Check Also

मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *