facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / औषधांच्या बोगस जाहिरातींवर कारवाई
13516340_115290022235705_871404053873110509_n

औषधांच्या बोगस जाहिरातींवर कारवाई

आवाज न्यूज लाईन

मुंबई : मधुमेह, लठ्ठपणा घालवणे, लैंगिक क्षमता वाढवणे, उंची वाढवणे, मानसिक आजार, स्त्रियांचे आजार, कर्करोग, संधीवात अशा विविध आजारांवर रामबाण उपाय वगैरेचा दावा करणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातींवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) राज्यभर आठवडाभर मोहीम राबवत तब्बल दीड कोटींची औषधेही जप्त केली आहेत. एकूण ९४ छापे टाकून २६३ प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्या औषधांवर कारवाई करण्यात आली आहे.
ऑनलाइन होणाऱ्या बेकायदा औषधविक्रीविरोधात आणि त्याच्या जाहिरातबाजीविरोधात मयूर पाटील यांनी ऍड. वल्लरी जठार यांच्यामार्फत जनहित याचिका केलेली आहे. त्यात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले. याच पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी राज्यस्तरीय मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दूरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह जाहिरातींविरोधात कारवाई करण्यात आली. त्यात जप्त केलेल्या औषधांमध्ये स्टेऑन पॉवर कॅप्सूल, विगोफोर्ट टॅब्लेट, टॉप स्लीप कॅप्सूल, शुगर लॉक सिरप, व्ही-स्लिम कॅप्सूल, अभय मदारी स्लिम फिट सिरप, प्लेविन कॅप्सूल, फॅटगो कॅप्सूल, ३०३ कॅप्सूल, शुगरनाशक वटी, माय फेअर क्रीम, आरव्ही कॅप्स, अश्वतुल-डी एक्स कॅप्सूल, डायमेडिका प्युअर आयुर्वेदिक प्रोडक्ट, लॉँग हाइट एक्स्ट्रा स्ट्रॉंग कॅप्सूल, फॅट क्युअर रस, लुक लाइक-१६ इत्यादी औषधांचा समावेश आहे. कायद्यानुसार अशा जाहिराती प्रतिबंधित असून, त्यातील प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन ‘एफडीए’चे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि केले आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *