facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / पुन्हा ” अबकी बार मोदी सरकार “
modi

पुन्हा ” अबकी बार मोदी सरकार “

पुढील वर्षी एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करताना भाजप अडखळत होता; पण पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईनंतर आता भाजपचा आलेख उत्तर प्रदेशात वाढणार आहे. प्रत्येक निवडणुकीत कुठल्या ना कुठल्या लाटेवर स्वार होण्यास उत्सुक असलेल्या उत्तर प्रदेशात आता मायावतींचा बसप, मुलायमसिंह यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसपुढे मोदी यांच्या भाजपचे प्रबळ आव्हान असेल. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे सत्ताधारी समाजवादी पक्ष निवडणुकीपूर्वी निस्तेज झाला आहे. त्याचा फायदा मायावती यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे बसप विरुद्ध भाजप अशी लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाकिस्तानवरील कारवाईमुळे बसपचे आव्हान मोडून भाजपला बाजी मारण्याची संधी मिळणार आहे. पाकिस्तानच्या सीमावर्ती पंजाबमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विधानसभेची निवडणूक होणार असून, त्यात सत्ताधारी भाजप-अकाली दलाला विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याची संधी क्षीण आहे. पण आजच्या सर्जिकल हल्ल्यांमुळे पंजाबमध्येही हवा अनुकूल होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर लष्कराला सॅल्युट, मोदींचाही जयजयकार

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जवानांनी उरीमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा होत असतानाच ‘सोशल मीडिया’वरही एकापेक्षा एक जबरदस्त प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘फेसबुक’ आणि ‘ट्वीटर’वर ‘सोशलाइट्स’च्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले असून, जोरदार टोलेबाजी पहायला मिळाली.

कुणी म्हणे ‘लपून छपून नाही, घरात घुसून मारलंय’ तर कुणाच्या मते ‘याला म्हणतात ५६इंची छाती…’ ‘नडला की तोडला…’ नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही काहींनी खडे बोल सुनावले ते अशा शब्दात, ‘फेसबुकवरील सल्लागारांना धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचे ऐकतात,’ आणि ‘याला म्हणतात ‘करून दाखवणे’, बाकी डरकाळ्या, सज्जड दम वगैरे चालू द्या…’

‘दसऱ्यापूर्वीच सीमोल्लंघन’ आणि ‘चड्डीत रहायचं’ अशीही स्टेटस अपडेट्स पहायला मिळाली. ‘देर से आयो, पर दुरुस्त आये’ अशा शब्दात समाधान व्यक्त होत होते, तर काहींनी ‘ना जल्द, ना फुर्सत से, निर्णय होते है संयम से’ अशी भूमिका व्यक्त केली होती. कुणाला ‘हर हर मोदी’ आठवण झाली, तर कुणी थेट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचा दाखला दिला. ‘साप विखारी देशजजनीचा ये घेऊ

जावा, अवचित गाठुनि ठकवुनि भुलवुनि कसाही ठेचावा,’ हे सावरकरांचे वचन फेसबुकवर भलतेच शेअर होते होते. लाइक्स आणि कमेंटही मिळवित होते.

‘सुधर जाओ पाकी, क्योंकि…

ये तो सिर्फ झाँकी है, कारवाई अभी बाकी है…’ असा इशाराही उत्साही मंडळींनी देऊन टाकला. काहींनी त्यात बदल करून ‘यह तो अभी झांकी है, फिल्म अभी बाकी है…’ स्टेट्स फिरविले.

‘अब तो नगाडा बजही चुका है, सरहद पर शैतान का

नक्षे पर से नाम मिटा दो , पापी पाकिस्तान का’

आणि

‘दूध मांगोगे खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे…’ या नेहमीच्याच घोषणाही फेसबुकवर भलत्याच लोकप्रिय ठरत होत्या. ‘सुन ले

बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान’ हे अपडेटही भलतेच भाव खाऊन गेले.

‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनो, मरण पत्करण्यासाठी तुम्हाला ‘एलओसी’ ओलांडण्याची आवश्यकता नाही. आता लष्कराने ‘होम डिलिव्हरी’ची सुविधाही उपलब्ध केली आहे. आणि उत्सवानिमित्ताने विशेष ऑफर्सही उपलब्ध आहेत,’ या स्टेट्स अपडेट्सने अनेकांची वाहवा मिळविली.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *