facebook
Saturday , December 3 2016
Home / Crime / मालमत्तेसाठी आईला पंख्याला लटकवले!
crime

मालमत्तेसाठी आईला पंख्याला लटकवले!

मालमत्तेच्या वादातून ८० वर्षांच्या आईला पंख्याला लटकवून तिच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या सुरेंद्र सत्तार वैद्य नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अंधेरीतून अटक केली आहे. तीन वर्षांपासून तो आईचा छळ करत होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला.

अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात आरोपी सुरेंद्र हा पत्नी, बहीण आण‌ि आई मायावती यांच्यासोबत राहत होता. सुरेंद्र याचे मालमत्तेवरून आईसोबत वाद सुरू होते. यामुळे मायावती यांना नैराश्य आले होते. सुरेंद्र, त्याची पत्नी आण‌ि बहिणीच्या मदतीने मायावती यांचा छळ करत होता. मागील तीन महिन्यांपासून या तिघांनी मायावती यांना अनेकदा मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी तर त्याने आईला पंख्याला बांधून मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या मायावतीची प्रकृती गंभीर आहे. या अत्याचाराची माहिती परिसरात महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांनी मायावती यांची सुटका केली. मायावती यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

news-1

दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – दहावीची परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांच्या करिअरमधली अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *