facebook
Sunday , December 4 2016
Home / देश / विदेश / लाच घेताना महिला जजला अटक
rachna

लाच घेताना महिला जजला अटक

दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या ज्येष्ठ महिला न्यायाधीश रचना तिवारी लखनपाल यांना एका वकिलाकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घरातून ९४ लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.

मालमत्ता वादाच्या एका खटल्यात पक्षकार असलेल्या इसमाच्या तक्रारीवरून सीबीआयनं ही कारवाई केली. या प्रकरणात न्या. रचना लखनपाल यांनी अॅड. विशाल मेहान यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. मालमत्तेची पाहणी करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याची जबाबदारी मेहान यांच्यावर होती. खटल्याचा निकाल फिर्यादीच्या बाजूनं लावण्यासाठी मेहान यांनी फिर्यादीकडं स्वत:साठी २ लाख व रचना लखनपाल यांच्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली होती. फिर्यादीनं या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून लखनपाल यांना अटक केली.

रचना लखनपाल यांचे पती अलोक लखनपाल व वकील विशाल मेहान यांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोघे मिळून न्यायाधीशांना लाच मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

sumitra-mahajan-loksabha-580x393

फक्त टीव्हीवर झळकण्यासाठी खासदारांचा गोंधळ -लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : एकीकडे देशभरात बँक ग्राहकांच्या संयमी रांगा असताना संसदेत मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *