facebook
Thursday , February 23 2017
Breaking News
Home / Featured / आशा भोसलेचा पाकिस्तानीला झटका

आशा भोसलेचा पाकिस्तानीला झटका

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर, भारतीय आणि पाकिस्तानी नेटिझन्समध्ये वाक्-युद्ध भडकलं असताना, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक ट्विट भलतंच ‘हिट’ ठरलं. पण, त्याहीपेक्षा या ट्विटमुळे खवळलेल्या पाकिस्तानी ट्विपल्सना आशाताईंनी दुसऱ्या ट्विटमधून जे उत्तर दिलं, ते तर आणखीच ‘चाबुक’ होतं.

झालं असं की, ट्विटरवर आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या, घाणेरड्या प्रतिक्रिया देणाऱ्यांवर आशा भोसले संतापल्या होत्या. त्यांचा उल्लेख त्यांनी ‘अॅब्युझिव्ह कुत्ते’ (शिव्या देणारे कुत्रे) असाच केला. ‘शिव्या देणारे अनेक कुत्रे मला फॉलो करत आहेत, त्या सगळ्यांना ‘डिलिट’ केलं, असं ट्विट आशाताईंनी केलं. तेव्हा त्यातील ‘अॅब्युझिव्ह कुत्ते’ हा शब्द पाकिस्तानसाठी वापरल्याचा काही पाकिस्तानी नेटिझनचा समज झाला. त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तेव्हा, आशाताईंना त्यांना ‘जोर का झटका’ दिला.

 

‘स्ट्रेट फॉरवर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि फिरकी घेण्यातही माहीर असलेल्या ताईंनी या पाकिस्तानी मंडळींसाठी लगेचच दुसरं ट्विट केलं. त्यात एक उपहास होता आणि तो वर्मी लागणाराच होता. ‘मी अॅब्युझिव्ह कुत्ते म्हटलंय, पाकिस्तानी कुठे म्हटलंय? कुणीही अॅब्युझिव्ह असूच शकतं की’, असं आशाताईंनी त्यांना सुनावलं आणि सगळ्यांची बोलतीच बंद झाली. तर, या हजरजबाबीपणाबद्दल भारतीय फॉलोअर्स आशाताईंवर भलतेच खुश झाले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *