facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे पालिकेचा गौरव

नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे पालिकेचा गौरव

आवाज न्यूज लाईन

पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात सर्वाधिक वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारण्याची कामगिरी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नवी दिल्लीतील विज्ञानभवनात झालेल्या कार्यक्रमात ‘स्वच्छ’ संस्थेच्या राधाबाई सावंत यांनी मोदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या वेळी महापौर प्रशांत जगताप, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या कामाबद्दल मोदींनी ‘स्वच्छ’च्या कामाचे कौतुकही केले.

 केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या माध्यमातून पुणे महापालिकेने शहरात सुमारे २०,४५१ वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर शहराने १९ हजार स्वच्छतागृहे उभारून दुसरा क्रमांक मिळवला. देशात सर्वाधिक स्वच्छतागृहे उभारल्याने पुणे शहराला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्राने काही दिवसांपूर्वीच केली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रातील अधिकारी, महापालिकेचे सभागृह नेते शंकर केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे अशोक हरणावळ, महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त सुरेश जगताप उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वैयक्तिक स्वच्छतागृहाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. या अभियानांतर्गत आणखी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
प्रशांत जगताप, महापौर

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *