facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / देश / विदेश / पंतप्रधानांचा नवा नारा; अभियानाला दोन वर्षे पूर्ण

पंतप्रधानांचा नवा नारा; अभियानाला दोन वर्षे पूर्ण

‘अंदाजपत्रकात निधीची तरतूद करून देश स्वच्छ होणार नाही. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याविरोधात ‘सत्याग्रह’ आंदोलन सुरू केले होते. त्याच धर्तीवर देशात ‘स्वच्छताग्रही’ आंदोलन सुरू करण्यात येईल,’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. स्वच्छ भारत अभियानाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री उपस्थित होते. स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळालेल्या जिल्ह्यांचा, महापालिकांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.

 मोदी म्हणाले, ‘अस्वच्छतेविषयी लोकांच्या मनात घृणा, तिरस्कार निर्माण होण्याची गरज आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला, नेत्याला स्वच्छतेसारखा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी हिंमत लागते. स्वच्छता अभियानाबाबत राजकीय पक्ष आणि नेत्यांना मागे सोडून जनता पुढे गेली आहे. आता देशात स्वच्छतेबाबत स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण स्वच्छ भारत अभियानासाठी महत्त्वाचे आहे.’

‘हे अभियान माझ्यापेक्षाही प्रसारमाध्यमांनी पुढे नेले आहे. स्वच्छता बजेटमधून येणार नाही, स्वच्छता ही सवय बनली पाहिजे. देशात अस्वच्छता ठेवणार नाही, कचरा करणार नाही आणि करूही देणार नाही, असा निर्धार केल्यास देश आपोआप स्वच्छ होईल. स्वच्छतेचा संबध आपण देवत्वाशी जोडला पाहिजे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून कंपोस्ट खत तयार झाले पाहिजे,’ असेही मोदी म्हणाले.

Check Also

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क – क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *