facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस येत्या रविवारी रद्द

प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस येत्या रविवारी रद्द

आवाज न्यूज लाईन

पुणे : मुंबई विभागात स्टेशन येथे मेन लाइनवर नऊ तासांचा मेगा ब्लॉक आणि हार्बर लाइनवर तीन ते साडेतीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी, दोन ऑक्टोबरला पुण्यावरून जाणारी व मुंबईवरून पुण्याकडे येणारी प्रगती व सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दिवा स्टेशन येथे सीएसटी ते कल्याण या मार्गावरील नवीन लाइनच्या कामासाठी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कल्याण-दिवा व कल्याण-मुलुंड या मार्गावरील ‘स्लो ’लोकल ‘फास्ट’ लाइनवर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवेवर देखील परिणाम होणार आहे. प्रगती व सिंहगड या दोन्ही गाड्यांची पुणे-मुंबई-पुणे सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांना डेक्कन क्वीनचाच पर्याय असणार आहे.प्रगती, सिंहगड एक्स्प्रेस येत्या रविवारी रद्द

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *