facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / राज ठाकरेंनी दिला सलमानला टोला

राज ठाकरेंनी दिला सलमानला टोला

भारतीय लष्कराने केलेला ‘सर्जिकल स्ट्राइक’ योग्यच होता. ते दहशतवादी होते, त्यांच्यावर कारवाई झाली हे चांगलंच झालं. पण, पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी आहेत का? मग, त्यांना भारतात काम करण्यास बंदी का?, अशी भूमिका सलमान खाननं मांडली होती. स्वाभाविकच, त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. पण, पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याची धमकी देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावर काय भूमिका घेते, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. राज ठाकरे आपल्या या मित्राचे कान उपटतात की त्याला बचाव करतात, याकडे राजकीय आणि सिनेवर्तुळाचं लक्ष लागलं होतं. परंतु, जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राज यांनी सलमानला खास आपल्या ‘स्टाइल’नं सुनावलं.

‘मीही एक कलाकार आहे. कलाकार काही आभाळातून पडत नाहीत. आम्ही ४८ तासांचे अल्टिमेटम दिल्यानंतर पाकिस्तानचे कलाकार येथून निघून गेले. तुम्ही उरी हल्ल्याचा तुम्ही निषेध करता का?, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. आम्ही पाकिस्तानी नागरिक असल्याचं त्यांनी सांगितलं. मग त्यांचे कलाकार अशी भूमिका घेत असतील तर आमच्या कलाकारांनी त्यातून बोध घ्यायला नको का? आपले कलाकार तिथे का जातात?’, असा खडा सवाल राज यांनी केला.

कलाकाराला कोणत्याही सीमेचे बंधन नसते असे म्हणतात. मग उद्या देशाची सुरक्षा करणाऱ्या आपल्या जवानांनी शस्त्रे खाली ठेवायचे ठरवले आणि गुलाम अलींची मैफल बघायला जातो असे ते म्हणाले तर चालणार आहे का?, सीमेवर पहारा देतात म्हणजे ते आपले नोकर नाहीत. तिथे राहून ते आपली सुरक्षा करतात याचे भान ठेवायला हवे, असा संतापही राज यांनी व्यक्त केला. पाकिस्तानातील लोक चांगले आहेत असे बरेचजण म्हणतात. पण त्याच्याशी मला काय देणंघेणं आहे. आपल्याला तरी तिथून दहशतवादीच येताना दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपल्या दीडशे कोटींच्या देशांत टॅलेंटची कमी नाही. मग, पाकिस्तानातून येथे ‘कर्जाऊ’ कलाकार मागवायची गरजच काय?, असा प्रश्नही राज यांनी केला. सलमान खान केवळ धंदा बघतोय. त्याचे सिनेमे पाकमध्ये बक्कळ कमाई करतात. पण, महेंद्रसिंग धोनीवरील चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. ते कसं खपवून घेतलं. यावरही कुणी बोलणार आहे की नाही?, असं विचारत त्यांनी सलमानचे कान उपटले.

दरम्यान, उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत देश सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार येथील सर्व पाकिस्तानी कलाकार माघारी परतले होते. दुसरीकडे ‘इम्पा’नेही भारत-पाक यांच्यातील तणाव निवळेपर्यंत पाक कलाकारांना बॉलिवूडची दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सलमानचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *