facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / ‘समृद्ध जीवन’च्या १९ जणांवर गुन्हा

‘समृद्ध जीवन’च्या १९ जणांवर गुन्हा

आवाज न्यूज लाईन

पुणे : समृद्ध जीवन फाउंडेशनचे संस्थापक महेश मोतेवार यांच्या पत्नीसह समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या १९ जणांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांमध्ये गुरुवारी गुन्हा दाखल झाला. संबंधित गुंतवणूकदारांची ४१ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
किरण शांतीकुमार दीक्षित (वय ५३, रा. गणेशमळा, दत्तवाडी) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून समृद्धी जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संचालक प्रसाद चिद्रावार, लीना मोतेवार, वैशाली मोतेवार, वनश्री चिद्रावार आणि इतरांवर ‘महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९’च्या कलम ३ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित सेवानिवृत्त आहेत. दरम्यान त्यांनी समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची मुदतठेव आणि अन्य योजनांची जाहिरात पाहिली. आकर्षक व्याजाच्या हेतूने त्यांनी ३० जुलै २०१५मध्ये निवृत्तीनंतर प्राप्त झालेली काही रक्कम कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवली. गुंतवणुकीच्या रितसर पावत्याही त्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात ‘समृद्ध जीवन’बाबत विविध वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमुळे दीक्षित यांनी मुदतपुर्तीनंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली. मात्र, संचालकांना पोलिसांनी अटक केली अशून, आताच पैसे देण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. दीक्षित यांच्याप्रमाणेच वसंत कालिदास ठाकूर यांनीही ४ डिसेंबर २०१४मध्ये ३५ लाखांची गुंतवणूक केली. मुदतपूर्तीनंतर त्यांनीही कंपनीकडे रक्कम परत मागितली. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना टोलवण्यात आले. शेवटी कंटाळून ठाकूर यांनी कंपनीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम तपास करीत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *