facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / मुंबई / सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तोडा: कोर्ट

सर्व बेकायदा प्रार्थनास्थळे तोडा: कोर्ट

‘सार्वजनिक जमिनींवरील सर्व धर्मांची बेकायदा प्रार्थनास्थळे शोधून निश्चित करण्याचे काम येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा आणि यापूर्वीच निश्चित झालेल्या २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या बेकायदा प्रार्थनास्थळांवर तोडकामाची कारवाई ३१ डिसेंबर २०१६च्या आत पूर्ण करा’, असे आदेश आज मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला दिले.

कोणताहा धर्म हा बेकायदा प्रार्थनास्थळात प्रार्थना-पूजा करा, असे म्हणत नाही. त्यामुळे सरकारकडून कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईत कोणत्याही धर्माचे धर्मगुरू हस्तक्षेप करणार नाहीत, अशी अपेक्षा कोर्टाने यावेळी व्यक्त केली. कारवाईत राजकीय नेते किंवा कोणीही हस्तक्षेप केला तर फौजदारी कारवाई सुरू करून त्यांच्यावर गुन्हे नोंदवा, असे स्पष्ट आदेशच यावेळी कोर्टाचे राज्य सरकार, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना दिला.तोडकामाची कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महापालिका व अन्य नियोजन प्राधिकरणांच्या कर्मचारी वर्गाला पोलीस बंदोबस्त द्या आणि आवश्यक असेल तर सशस्त्र पोलीसही पथकामध्ये द्या, असे नमूद करत कोर्टाने राज्य सरकारलाही यासंदर्भात निर्देश जारी करण्याचे आदेश दिले.

निकालातील महत्त्वाची निरीक्षणे…

– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने २९ सप्टेंबर २००९ नंतरच्या बेकायदा प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यासाठी तसेच या तारखेपूर्वीच्या प्रार्थनास्थळांना नियमित वा कारवाई करण्याविषयी धोरण आखले. परंतु राज्य सरकारने फारशी कारवाई केलेलीच नाही. कारवाई कागदावरच राहिली आहे.

– रस्ते व फुटपाथ विनाअडथळा असणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.

– रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून बेकायदा प्रार्थनास्थळे उभारता येणार नाहीत.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *