facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / ‘त्या’ व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची अखेर माफी
uddhav-thackeray

‘त्या’ व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंची अखेर माफी

मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत ‘सामना’मध्ये छापलेल्या कथित आक्षेपार्ह व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर आज माता-भगिनींची माफी मागितली आहे. या व्यंगचित्रातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण जर कुणी नकळत दुखावलं असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागतो, असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मराठा समाजाचा रोष टाळण्यासाठीच शिवसेना नरमल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

शिवराय आमचं दैवत आहे, बाळासाहेब आमचे आदर्श आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून, शिवसैनिकांकडून माता-भगिनींचा अपमान होऊच शकत नाही, असं ठामपणे सांगून उद्धव म्हणाले की, काहींनी ‘सामना’तील व्यंगचित्रावरून आग लावण्याचा प्रयत्न केला. आम्हाला धमक्या दिल्या. शिवसेनेचे आमदार, खासदार नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या. पण, शिवसेनेवरील विश्वासामुळे महाराष्ट्राने सगळे प्रयत्न हाणून पाडले. शिवसेना सर्वांना पुरून उरली. आता वातावरण शांत झालं आहे, पण अपप्रचार माझ्या जिव्हारी लागलाय. म्हणूनच, त्या व्यंगचित्रामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. कुणाच्याही दबावामुळे आम्ही झुकलेलो नाही, तर अत्यंत प्रामाणिकपणे आईसमोर नतमस्तक होतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *