facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / कासेवाडीतील बेपत्ता मुलींचे मृतदेह आढळले
crime

कासेवाडीतील बेपत्ता मुलींचे मृतदेह आढळले

आवाज न्यूज लाईन

पुणे : प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय

कासेवाडी परिसरातून गायब झालेल्या तीन विद्यार्थिंनींपैकी दोघींचे मृतदेह हडपसर आणि वानवडीतील कॅनॉलमध्ये शुक्रवारी रात्री आढळले. प्रेम प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना समजल्यामुळे घाबरून या मुलींनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या मुलीचा शोध अद्याप सुरू आहे.
शृती दिगंबर वाघमारे (वय १५) आबेदा शेख (वय १४ दोघीही रा. कासेवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर, मुस्कान इम्तियाज मुलतानी (वय १३, तिघीही रा. कासेवाडी) हिचा अद्याप शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आबेदा अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत, तर मुस्कान आठवीमध्ये शिकते. शृती राज धनराज गिरी महाविद्यालयात अकरावीला शिकत होती. या तिघींही मैत्रिणी असून, एकाच परिसरात राहतात.

गुरुवारी सायंकाळी खेळण्यासाठी म्हणून तिघीही घरातून बाहेर पडल्या. मात्र, घरी परतल्याच नाहीत. त्यानंतर पालकांनी तिघींचा शोध घेतला असता, त्या सापडल्या नाहीत. शेवटी पालकांनी खडक पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान, गोळीबार मैदान येथे गुरुवारी सायंकाळी कॅनॉलच्या शेजारी पडलेल्या दप्तरातील मोबाइल वाजला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या नागरिकांनी ही घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना कॅनॉलजवळ दप्तर, मोबाइल, ओढणी, चप्पल आढळून आली. मोबाइलवरून शोध घेतला असता तो कासेवाडीचा निघाला. हा मोबाइल मुस्कानचा असल्याचे तपासाअंती समजले. त्यानंतर कासेवाडीमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता, तिघी गायब असल्याचे समजले. त्यामुळे खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर या तिघींचा शोध घेण्यात आला. मुस्कानच्या मोबाइलची तपासणी केली असता, तिने मित्राला फोन करून आपल्याला जगण्याची इच्छा राहिली नसल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे. संबंधित मित्राकडेही चौकशी करण्यात आली. अग्निशमन दलाकडून कॅनॉलमध्ये मुलींचा शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शृतीचा मृतदेह वानवडी येथील चिमटे वस्ती कॅनॉलमध्ये सापडला. तर, आबेदाचा मृदतेह हडपसर येथे सापडला.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *