facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / दहशतवाद्यांची पळापळ; रिकामे केले PoKतील तळ
419465-pakisi04-10-15

दहशतवाद्यांची पळापळ; रिकामे केले PoKतील तळ

भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे दहशतवादी पार हादरले असून पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवरून त्यांनी पळ काढला आहे. भारताकडून पुन्हा अशी धडक कारवाई झाल्यास दहशतवादी आणि त्यांच्या शस्त्रांचं नुकसान होऊ नये, म्हणून दहशतवाद्यांचे ‘पालनकर्ते’ असलेल्या पाकिस्तानी सैन्यानंच त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळचे दहशतवाद्यांचे डझनभर तळ मनशेरा, नौशेरा आणि झेलम या भागात हलवण्यात आल्याचं गुप्तचर यंत्रणेकडून समजतं. या तळांवर ५०० हून अधिक दहशतवादी होते. त्यातील बहुतांश अतिरेकी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिनचे होते, असंही गुप्तचरांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय.

 उरी येथील हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं गुरुवारी घेतला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी त्यांच्या घरात घुसून मारलं होतं. मुरी आणि रावळकोटमधील सात दहशतवादी तळ त्यांनी उद्ध्वस्त केले होते. या कारवाईमुळे पाकचं आणि दहशतवाद्यांचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळे त्यांनी आपला मुक्काम दूरवर हलवलाय. आता दहशतवाद्यांचे काही तळ मुझफ्फराबादपासून ५० किमी अंतरावर मनशेरा येथे नेण्यात आलेत, तर नौशेरा आणि हझियामा (झेलम) तर २५० किमी लांब पंजाब प्रांतात आहे. या दहशतवादी तळांवर मध्यरात्री अडीच वाजल्यापासून हालचाली सुरू होतात. नव्या मुलांना शारीरिक कसरती आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं, असं गुप्तहेरांनी सांगितलं.

‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर दहशतवाद्यांनी माघार घेतल्याचं चित्र दिसत असलं तरी, भारतानं गाफिल राहून चालणार नाही, उलट त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आता आणखी बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचा इशारा जाणकारांनी दिला आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *