facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांत बदल
train

मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांत बदल

आवाज न्यूज लाईन

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून लोकलप्रमाणेच लांब पल्ल्यांच्या मार्गावर वेळापत्रकांपासून गाड्यांच्या वेगापर्यंत विविध बदल केले आहेत. पश्चिम रेल्वेवर डहाणू ते दादरपर्यंत चालणाऱ्या १४ मेमू गाड्यांऐवजी लोकल चालवण्याचा निर्णयही अंमलात येणार आहे.

कोकणासाठी तेजस एक्स्प्रेस

मध्य रेल्वेवर सीएसटी ते करमाळी मार्गावरील सेवेत वेगवान ठरणाऱ्या तेजस एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला आहे. सीएसटी ते करमाळी तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस धावणार आहे. गाडी क्र. ११२०९ ही सीएसटीहून रात्री १२.२० वाजता सुटून करमाळी येथे सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर गाडी क्र. ११२१० करमाळीहून दुपारी १२.२० वाजता सुटून सीएसटी येथे रा. १०.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी प्रत्येक मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी धावेल. या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, थिवीम असे थांबे देण्यात आले आहे.

 काही गाड्यांचा विस्तार

हजूर साहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता आठवड्यातून सहा दिवस धावणार असून, तिचा पनवेलपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी नांदेडहून रा. ८.३० ऐवजी सायं. ५.३० वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी स. ९ वाजता पोहोचेल, पनवेलहून दु. ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी स. ९.२५ वाजता नांदेडला पोहोचेल.

मनमाड-सीएसटी पंचवटी यापुढे मनमाडहून स. ६.०२ ऐवजी स. ६.१० वाजता सुटेल. मनमाड-पुणे एक्स्प्रेस मनमाड येथे रा. ९.५५ ऐवजी ९.१५ वाजता सुटेल, तर लातूर सीएसटी गाडीला आता ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे.
मेमूऐवजी लोकल

पश्चिम रेल्वेवरील नव्या वेळापत्रकात एकही नवीन लोकल धावणार नसून, फेऱ्यांमध्येही बदल होणार नाहीत. केवळ दादर ते डहाणूपर्यंत चालविण्यात येणाऱ्या १४ मेमू गाड्या बदलून लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच १२४ मेल-एक्स्प्रेसच्या वेगात वाढ करण्यात आली आहे. त्यातून पाच मिनिटांपासून १७० मिनिटांपर्यत प्रवास वेळेत बचत होण्याचा दावा केला आहे.
काही गाड्या सुपरफास्ट

पश्चिम रेल्वेववरील नव्या वेळापत्रकात २६ मेल-एक्स्प्रेस सुपरफास्ट म्हणून चालविण्यात येणार आहेत. २६ गाड्यांना अतिरिक्ति थांबादेखील देण्यात येणार आहे. २२९२१-२२ वांद्रे टर्मिमस-गोरखपूर सुपरफास्ट अंत्योदय, उधाना-जयनगर अंत्योदय या नवीन गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *