facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / शॉपिंगची उलाढाल २५ हजार कोटी!
amavs

शॉपिंगची उलाढाल २५ हजार कोटी!

पितृपक्षाच्या समाप्तीनंतर वेध लागतात ते नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे.. या पार्श्वभूमीवर आगामी सणासुदीच्या दिवसांत भारतीय ग्राहकांकडून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली होती. यंदा खरेदीमध्ये २५ टक्के वाढ होईल, असा अंदाज उद्योगांची शिखर संघटना असणाऱ्या ‘असोचेम’ने वर्तवला आहे.

मोठ्या सणांचा श्रीगणेशा उद्या १ ऑक्टोबरपासून, नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून होत असून, यात यंदा विक्रमी खरेदी होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन, शॉपक्लूज डॉट कॉम आदी ऑनलाइन रिटेल कंपन्यांच्या दिवाळी बंपर सेलना सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे मत ‘असोचेम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

 असोचेम’तर्फे २५ ते ४० या वयोगटातील विविध शहरांतील अडीच हजारहून अधिक नोकरदारांशी संवाद साधण्यात आला. आगामी फेस्टिव्ह सीझनमधील खरेदीचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी ‘असोचेम’ने पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता आणि लखनौ आदी शहरांमध्ये सर्वेक्षण केले. ‘गेल्या काही वर्षांतील फेस्टिव्ह सीझनपेक्षा यंदाची सणासुदी वेगळी असणार आहे. साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन आणि पारंपरीक पद्धतीने २५ हजार कोटी रुपयांची खरेदी होण्याचा अंदाज आहे,’ अशी माहिती ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी दिली.

वेतन आयोग कारणीभूत

यंदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू झाला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यातच फरकाची रक्कम एकरकमी प्राप्त झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम फेस्टिव्ह सीझनवरही होण्याची शक्यता आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *