facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / मुंबई / अंमली पदार्थांचा ‘दांडिया’मार्ग?

अंमली पदार्थांचा ‘दांडिया’मार्ग?

नवरात्रोत्सवच्या काळात तरुणाईकडून अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या घटना मागील अनेक वर्षांपासून समोर आलेल्या असतानाच ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी स्टँडवरूनच उत्सवाच्या तोंडावर सुमारे २५ किलोचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा दांडियाच्याच पार्श्वभूमीवर शहरात आणला जात असल्याची शक्यतेला यामुळे अधिक बळकटी मिळाली आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध घडांमोडींच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वेस्थानक संवेदनशील परिसर बनला आहे. त्यामुळे त्याठिकाणी गस्तीसाठी वारंवार स्थानिक ठाणेनगर पोलिसांचा राबता असतो. त्यातच गुरुवारी रात्री सायंकाळी ठाणेनगर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, पोलिस शिपाई अविनाश पांढरे, आसिफ तडवी, लक्ष्मण कांबळे आदींचे पथक पिटर – २ मोबाइल व्हॅनसह रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले होते. त्याचवेळी गस्तीदरम्यान एसटी स्थानक परिसरातील बोरीवली बसथांब्यांवर खूप गर्दी जमल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र पोलिसांची गाडी पाहताच गर्दीतील महिलेसह सोबतचे दोन्ही पुरुष पळू लागले. त्याचवेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी गाडीतून खाली उतरून आरोपींचा पाठलाग केला आणि महिलेला ताब्यात घेतले. तर इतर आरोपींना पोलिसांनी जागीच रोखले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील काळ्या रंगाची सॅक आणि प्रवासी बॅगेतून गांजाची १२ पाकिटे सापडले. तब्बल २५ किलो ७०० ग्रॅम गाजांची किंमत अडीच लाख रुपये असल्याचे ठाणेनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. या प्रकरणी अजयकोसेकुमार थेवर (४५), निथीराजन थेवर (४२) हे दांपत्य आणि पांदीयाममल थेवर (४५) या त्यांच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.

 नेटवर्कचा शोध सुरू!

गांजाची एकूण पॅकिंग पाहता आरोपी सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यातच नवरात्रोत्सवादरम्यान दांडियाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असणारी तरुण मंडळी त्यांची टार्गेट आहेत का, अथवा त्यांच्या इतर नेटवर्कबाबतही शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *