facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / बॅडमिंटनचा पाकवर बहिष्कार

बॅडमिंटनचा पाकवर बहिष्कार

इस्लामाबाद, पाकिस्तान येथे होत असलेल्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने घेतला आहे. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांमार्फत भारतात होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटन असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी म्हटले आहे की, १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेत कुणीही भारतीय खेळाडू सहभागी होणार नाही. भारतीय नागरिकांच्या भावनांचा आम्ही आदर करताना आम्ही हा निर्णय घेतला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *