facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर

मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर

मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील रेणा नदीला मोठा पूर आला असून या पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश आले आहे. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव येथे २३ गावकरी शनिवारी सकाळी सात वाजेपासून पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका केल्याचे समजते.

लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे.

लातूर, नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर

लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीरबनत चालल्याचे लक्षात येताच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टर मागवले. शिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचीही मदत घेण्यात आली.

लातूरमधील भातखेडाच्या पुलावरुन पाणी गेलं आहे. लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसेच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरुन पाणी गेल्यानं अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच जळकोट तालुक्यात तलाव फुटून पीकांना मोठं नुकसान झाले आहे.

उदगीरमध्ये तिरु नदीला मोठा पूर आल्याने जवळपास १५० घरांमध्ये पाणी शिरले. पानगावातील रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्यामुळे शनिवारी सकाळी नांदेड-बंगळरू एक्स्प्रेस दोन तास पानगाव रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती.

उस्मानाबादमध्ये रात्रीपासून अतिवृष्टी, ईट, भूम परिसरात जोरदार पाऊस

उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून ईट आणि भूम परिसरात पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यातील तेरणा धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.

बीड जिल्ह्यालाही मोठा तडाखा

बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीडमधील मांजरा नदीलाही पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड मध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय ठिकठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. भुसावळमधील वरणगाव येथील रामपेठ व अयोध्यानगर भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.

पुढील ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *