facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / क्रीडाजगत / सानिया-बार्बोराला उपविजेतेपद

सानिया-बार्बोराला उपविजेतेपद

भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची जोडीदार बाबरेरा स्ट्रायकोव्हा यांना डब्लूटीए वुहान खुल्या टेनिस स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेथानी मॅटेक-सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा या अमेरिकन व चेक प्रजासत्ताक जोडीने अंतिम फेरीत सानिया-बाबरेराचा ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये सानिया-बाबरेरा पिछाडीवर पडले. त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी होती, परंतु त्यांनी चौथ्या गेममध्ये तीन ब्रेक पॉइंट गमावले. त्यानंतर सँड्स व साफारोव्हा यांनी सलग दोन गुणांची कमाई करून ६-१ असा सेट जिंकला. दुसऱ्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये सानिया-बाबरेरा जोडीने सव्‍‌र्हिस गमावली, मात्र त्यानंतर पुढील गेम जिंकून आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. सँड्स व साफारोव्हाने त्यांची पुन्हा सव्‍‌र्हिस मोडून चौथ्या गेममध्ये आघाडी घेतली. सानिया-बाबरेरा जोडीने अखेपर्यंत संघर्ष केला. मात्र, ४-५ असे पिछाडीवर असताना त्यांना निर्णायक गेममध्ये साजेसा खेळ करण्यात अपयश आले आणि सँड्स व साफारोव्हाने हाही सेट ६-४ असा जिंकून जेतेपद पटकावले.

क्विटोव्हाने जेतेपदाचा दुष्काळ संपवला

चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हाने ६३ मिनिटांच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या डॉमिनिरा सिबुल्कोव्हावर ६-१, ६-१ असा विजय मिळवून १३ महिन्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. या विजयाबरोबर क्विटोव्हाने डब्लूटीए वुहान खुल्या स्पध्रेच्या एकेरीचे जेतेपद नावावर केले. २०१४ मध्ये क्विटोव्हाने येथे जेतेपद पटकावले होते.

 

आनंदचा पराभव

मॉस्को : ताल स्मृती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेच्या चौथ्या फेरीत भारताच्या विश्वनाथन आनंदला विश्व अजिंक्यपद चॅलेंजर स्पध्रेतील माजी विजेत्या रशियाच्या व्हॅलदिमिर क्रॅमनिककडून पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर व्हॅलदिमिरने दमदार पुनरागमन करताना आनंदवर सहज मात केली.

दुसऱ्या पटावर नेदरलॅण्ड्सच्या अनिष गिरीने अप्रतिम कामगिरी करत रशियाच्या पीटर स्विडलरचा पराभव करून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. चीनच्या ली चाओने स्वत:ला सिद्ध करताना बोरीस गेलफांडला पराभवाची चव चाखवली. इयान नेपामनियॅचटेची आणि लेव्हन अ‍ॅरोनियन यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. गिरीने ३.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अध्र्या गुणांच्या फरकाने इयान दुसऱ्या, २.५ गुणांसह ली चाओ तिसऱ्या स्थानावर आहे. मॅमेद्यारोव्ह, क्रॅमनिक, अ‍ॅरोनियन आणि आनंद २ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

 

हॅमिल्टनला पोल पोझिशन

सेपांग : मर्सिडीझ संघाच्या लुइस हॅमिल्टनने मलेशियन ग्रां. प्रि. एफ-वन शर्यतीची पोल पोझिशन पटकावली आहे. शनिवारी सेपांग सर्किटवर पार पडलेल्या पात्रता फेरीत हॅमिल्टनने ५.५४३ किलोमीटरचे अंतर १ मिनिट ३२.८५० सेकंदात पार करून विक्रम प्रस्थापित केला. २००४ साली विलियम संघाच्या जुआन पॅब्लो मोंटोया यांच्यानंतर सेपांग येथे जलद लॅप वेळ नोंदवणारा हॅमिल्टन हा पहिला शर्यतपटू आहे.

‘जलद लॅप वेळ नोंदवण्याचा आनंद आहे. यापेक्षा कमी वेळात हे अंतर पार करता आले असते,’ असे हॅमिल्टन म्हणाला. हॅमिल्टनने पोल पोझिशनचे शतक पूर्ण केले. सर्वाधिक पोल पोझिशन पटकावणाऱ्या शर्यतपटूंमध्ये मायकेल श्युमाकर (११६) यांच्यानंतर हॅमिल्टनचा क्रमांक येतो. रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीत हॅमिल्टनचा सहकारी निको रोसबर्ग दुसऱ्या, तर रेड बुल संघाचा मॅक्स व्हेस्र्टाप्पेन तिसऱ्या स्थानावरून सुरुवात करतील.

सहारा फोर्स इंडियाचे शर्यतपटू सर्गिओ पेरेझ आणि निको हल्केनबर्ग अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानावरून सुरुवात करतील. पेरेझने १ मिनिट ३४.३१९ सेकंदात लॅप पूर्ण केली, तर हल्केनबर्गला १ मिनिट ३४.४८६ सेकंदाचा कालावधी लागला.

Check Also

मालिकावीर अश्विनवर वीरेंद्र सेहवागचा मजेशीर ट्विट्स

नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर मजेशीर ट्विट केले. इंदूर कसोटीमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *