facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / सैन्य दलात उत्साह;’राफेल’ वेळेआधीच येणार

सैन्य दलात उत्साह;’राफेल’ वेळेआधीच येणार

पठाणकोट, उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाक संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सकडून भारताला मिळणारी राफेल ही अत्याधुनिक मोठ्या क्षमतेची लढाऊ विमाने वेळेआधीच भारताला मिळणार आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज पुण्यात दिली. पर्रीकर यांच्या या माहितीनंतर भारताशी छुपे युद्ध पुकारलेल्या पाकिस्तानशी लढणाऱ्या भारतीय सैन्यदलांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राफेल या अत्याधुनिक विमानांबाबत फ्रान्सशी शुक्रवारी केलेल्या करारानुसार ही विमाने भारताला ३६ महिने अर्थात तीन वर्षांत मिळणार होती, मात्र ती लवकरच भारताला मिळणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे.

फायटर जेटसाठी ‘युरो ७.८७-बिलियन’ या करारावर भारत आणि फ्रान्स या उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराद्वारे मिळणाऱ्या लढाऊ विमानांमुळे पाकिस्तानवर मात करण्याच्या मोहिमेत भारतीय हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे.

फ्रान्सकडून मिळणाऱ्या या शक्तीशाली जेट फाटरमुळे भारताला दृष्टीच्या टप्प्यापलीकडे मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. या लढाऊ विमानांद्वारे हवेतल्या हवेत वेगवान मारा करणाऱ्या मिसाईलमध्ये १५० किमीची अधिकची क्षमता असणार आहे.

याचाच अर्थ असा, की आता भारतीय वायूसेनेला भारताच्या हद्दीत राहून पाकिस्तान आणि भारताच्या उत्तर तसेच पूर्वेकडील सीमेपलीकडे मारा करणे सहज शक्य होणार आहे.

पाकिस्तानकडे सध्या ८० किमीपर्यंतच्या टप्प्यावर मारा करू शकतील अशी मिसाईल आहेत.

भारताच्या राफेल जेटद्वारे ‘स्काल्प’ नावाचे मिसाईल डागण्याची मूभा मिळाली असून या मिसाईलमध्ये हवेतून जमीनीवर ३०० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *