facebook
Saturday , December 10 2016
Home / पुणे / पुण्यात कस्टमने एक कोटीचे ड्रोन पकडले
departure_lounge_pune_airport_india

पुण्यात कस्टमने एक कोटीचे ड्रोन पकडले

पुणे : उरी हल्ल्यानंतर देशात  सर्वत्र हायअलर्ट दिलेला असताना, पुण्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ड्रोन पकडण्यात आले आहेत. सीमा शुल्क विभागाने तब्बल एक कोटी रुपयांचे सात ड्रोन (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्या आले आहे.

 

सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव अमित तटके असे असून यांच्याविरुद्ध सीमाशुल्क कायदा 1962 आणि दूरसंचार अधिनियमन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तटके वेबनॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांनी कॅनडामधून येताना प्रिसीजन हॅक या कंपनीने तयार केलेले सात ड्रोन सोबत आणले होते.

 

लोहगाव विमानतळावर त्यांच्या साहित्याच्या तपासणीदरम्यान बॅगेत सात ड्रोन आढळले. या ड्रोनची विक्री हाईट्स नेक्स्ट कंपनीचे मालक विकास कुमार यांना केली जाणार होती, असे तटकेने सीमाशुल्क विभागाला सांगितले.

 

दरम्यान, या प्रकरणी आता कस्टम्सकडून वेबनॉईज आणि हाईट्स नेक्स्ट या कंपन्यांमधील व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे.

Check Also

news-9

‘देर से आए, लेकिन दुरुस्त आए’

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *