facebook
Saturday , December 10 2016
Home / मुंबई / डेंग्यूची चाचणी करा फक्त ६०० रुपयांतच!
dengue-test

डेंग्यूची चाचणी करा फक्त ६०० रुपयांतच!

डेंग्यूच्या साथीचा फायदा घेत मुंबईसह राज्यातील काही पॅथॉलॉजी लॅबनी चाचण्यांसाठी ८०० ते १,५०० रुपये दर आकारून रुग्णांची लूटमार सुरू केल्याचे उघड झाले आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी डेंग्यूच्या चाचणीसाठी ६०० रुपयेच आकारण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

मुंबईत डेंग्यू मलेरियाची साथ वाढली आहे. त्यातच ससंर्गजन्य तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. साधा ताप आला तरी डेंग्यूच्या संशयाने चाचण्या करण्यात येत आहे. त्यात काही रुग्णांमध्ये डेंग्यूसारखी लक्षणे आढळून येतात. पण, चाचण्यांमध्ये डेंग्यूचे निदान होत नाही. या सर्वांचा फायदा खासगी पॅथॉलॉजी लॅबनी घेण्यास सुरुवात केली आहे. काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये डेंग्यूच्या चाचणीसाठी ८०० ते १,५०० रुपये घेतले जातत असल्याच्या तक्रारी राज्याच्या आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. त्याची दखल घेत डेंग्यूचे निदान करण्याच्या चाचण्यांसाठी ६०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

रॅपिड टेस्टवर निर्बंध

डेंग्यूचे निदान तत्काळ करण्यासाठी अनेक ठिकाणी ‘रॅपिड डायग्नोस्टस्ट‌कि टेस्ट’ केली जाते. पण, या चाचणीत अनेकदा रोगाचे निश्चित निदान होत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रॅपिड किटने चाचण्या करून नयेत, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्याऐवजी ‘एनएस १’, ‘एलायझा’ व ‘मॅक एलायझा’ या चाचण्या कराव्यात. पण, त्यासाठी ६०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क घेतले जाऊ नये, असे आदेशात नमूद केले आहे.

दरांवर नियंत्रण कोणाचे?

सार्वजनिक आरोग्य खात्याने रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी दर निश्च‌ति केले आहेत. पण, पॅथॉलॉजी लॅबच्या दरांवर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न नैतिकतेने वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर विचारत आहेत.

Check Also

jpg

सीएसटी, विमानतळाच्या नावात आता ‘महाराज’

मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी विमानतळ’ आणि ‘छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस’ या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *