facebook
Saturday , December 3 2016
Home / Manoranjan / Box Office / धनुष आमचा मुलगा आहे, तामिळनाडूमधील जोडप्याचा दावा
dhanush-father-main

धनुष आमचा मुलगा आहे, तामिळनाडूमधील जोडप्याचा दावा

कोलावरी डी’ गाण्याने हिंदी चित्रपट रसिकांमध्येही प्रसिद्धीस आलेल्या अभिनेता धनुष सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्याने ते धनुषचे खरे आईवडिल असल्याचा दावा केला आहे.
प्रसारमाध्यमांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थिरुप्पुवनम गावातील केथिरेसन आणि मीनल हे धनुषचे खरे आईवडिल आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धनुषचे मूळ नाव केलैय्यासरन असून त्याने २००२ मध्ये आपले घर सोडले होते. शाळेत फारशी उल्लेखनीय कामगिरी करु न शकलेला धनुष त्यानंतर चेन्नईला जाऊन चित्रपटांमध्ये अभिनय करु लागला. इतक्या वर्षांनंतर धनुषच्या खऱ्या आईवडिलांचा चेहरा समोर आल्यामुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, ‘धनुष आमचा मुलगा आहे’, असा दावा करणारे केथिरेसन हे शिवगंगा जिल्ह्यातील राज्यपरिवहन विभागात कामाला आहेत. धनुष अभिनेता झाल्यानंतर आम्हाला एकदाही भेटला नाही असे केथिरेसन म्हणाले. एकदा आम्ही त्याला भेटण्यासाठी चेन्नईला गेलो होतो, पण, आम्हाला त्याला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. दरम्यान सध्या धनुषचे खरे पाकल असल्याचा दावा करणाऱ्या केथिरेसन यांनी आपला मुलगा परत मिळावा यासाठी पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले आहे. या जोडप्याने अचानकपणे केलेल्या या दाव्यामागचे खरे सत्या अद्यापही उलगडले नसले तरीही त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे अनेकजण चकित झाले आहेत.

सर्वांनाच्याच माहितीप्रमाणे धनुष हा चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांचा धाकटा मुलगा आहे. २००२ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करत विविध चित्रपटांमधुन काम करत धनुष प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी धनुषची निर्मिती अललेल्या ‘विसारानाई’ या चित्रपटाने ऑस्करवारीत प्रवेश केला आहे. २०१७ साठीच्या ऑस्कर पुरस्कारांच्या परदेशी भाषा चित्रपट विभागात भारतातील या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. धनुष त्याच्या चित्रपट कारकिर्दीसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. दाक्षिणात्य चित्रपटांतील आणि एकंदर भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा धनुष जावई आहे. असे असले तरीही सध्या मात्र धनुषचे खरे आईवडिल कोण यावरुनच अनेक चर्चा रंगत आहेत.

Check Also

bahubali-2-new-510x395

‘बाहुबली’ सिनेनिर्मात्यांच्या ऑफिसवर आयकर विभागाची धाड

हैदराबाद: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीचा सुपरहिट सिनेमा ठरलेल्या ‘बाहुबली’च्या निर्मात्यांच्या कार्यालयांची झडती घेतली. ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *