लग्नानंतर हनीमूनला जाणं ही एक सहज गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक लग्न करणारं कपल हे त्यांच्या हनीमूनबद्दल उत्सुक असतं. त्यासाठी कित्येक दिवसांपासून ते प्लॅनिंगही करत असतात. अनेकांना प्रश्न पडतो की, कुठे जायचं. याबाबत अनेक कन्फ्युजन असतात. तुम्हीही जर असा काही प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहोत. आणि यासोबतच एक खास ऑफरही या हॉटेलकडून देण्यात येते.

ज्या हॉटेलबद्दल आम्ही सांगतोय त्या हॉटेलकडून तुम्हाला हनीमून करण्याचे ७० लाख रूपये दिले जातील. होय हे खरंय. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. इस्राईलचं हे प्रसिद्ध हॉटेल येह्दा येथे आहे. त्यांनी त्यांच्या हनीमून ग्राहकांसाठी ही ऑफर सुरू केली आहे. इथे जर तुम्ही हनीमूनला गेलात तर हनीमूनसोबतच तुम्हाला ७० लाख रूपयेही मिळतील.

हॉटेलनुसार येह्दा हॉटेलमध्ये आलेल्या कपलमधील महिला हॉटेलने दिलेल्या तारखेनुसार प्रेग्नेंट राहिलं तर त्या कपलला ७० लाखांचं बक्षीस आणि हॉटेलचा सर्व खर्च माफ केला जाईल. ही ऑफर प्रत्येक चार वर्षांनी येते. हॉटेल लीप ईअरच्या दिवसात ही ऑफर ठेवतं. त्यामुळे कपल्स २९ फेब्रुवारीला येतात आणि हॉटेलमध्येच राहतात. या ऑफरमुळे इथे मोठी गर्दी बघायला मिळते.

जर एखादी महिला हा दावा करते की, ती प्रेग्नेंट आहे तर हॉटेलमधील डॉक्टरांची टीम तिची तपासणी करतात. जर तपासणी योग्य झाली तर ७० लाख रूपयांची रक्कम त्या जोडप्याला दिली जाते. सोबतच हॉटेलचा सर्व खर्चही माफ केला जातो. आहे ना कमाल….