facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / उजनी धरणाचे सात दरवाजे उघडले; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणाचे सात दरवाजे उघडले; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील धरणांपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील उजनी धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. उजनी धरण १०४ धक्के भरल्यामुळे सोमवारी सकाळी धरणाचे सात दरवाजे २३ सेटींमीटरने उघडण्यात आले. उजनीमधून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातून दोन वर्षांनंतर प्रथमच पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलेल्या मराठवाड्यातही पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्य़ांत रविवारीही पावसाचा जोर कायम होता. बिंदुसरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने बीड जिल्हा जलमय झाला होता. लातूर जिल्ह्य़ातील लोहा-कंधार तालुक्यात मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या २३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *