facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / धोनीच्या आवाजातील प्रेरणादायी डायलॉग (व्हिडिओ)

धोनीच्या आवाजातील प्रेरणादायी डायलॉग (व्हिडिओ)

शुक्रवारी रिलीझ झालेला एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातील एक प्रेरणादायी व्हिडिओ वायरल झाला आहे. टीम इंडियाचा वन डे कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याच्या आवाजातील एक व्हिडिओ रिलिझ करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्वतः माही आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधत आहे. मुझे यकिन है… म्हणतं धोनी आपल्या या सिक्रेटला चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची भूमिका साकारली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तीन दिवसांत ६० करोडहून अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. तर २० करोडहून अधिक कमाई करणारा या वर्षातील ही दुसरा सिनेमा आहे. धोन द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाच्या निमित्ताने धोनीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. आणि त्या निमित्ताने त्याने लव्हस्टोरीकडे पुन्हा एकदा धोनी प्रेमी आकर्षित झाले आहेत.

प्रदर्शनानंतर दोनच दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४१  कोटींहुन अधिक कमाई केली. यातून सुपर हिट सिनेमांना पछाडीवर टाकलं आहे. या सिनेमात धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांत राजपूतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केलं. मात्र, या सिनेमातील एका सीनवर टीम इंडियातील एका माजी फलंदाजाने प्रश्न उपस्थित करुन सिनेमाचे कौतुक केले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *