facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / नाशकात ओबीसी समाजाचा मूकमोर्चा, भुजबळांच्या सुटकेची मागणी

नाशकात ओबीसी समाजाचा मूकमोर्चा, भुजबळांच्या सुटकेची मागणी

राज्यात मराठा मूक मोर्चाचे वारे वाहत असताना सोमवारी नाशकात ओबीसी समाजानेही मूक मोर्चाच् रस्त्यावर उतरले आहेत. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येत ओबीसी नेतृत्व संपविण्याच्या निषेधार्थ व समाजाची ताकद दाखवण्यासाठी ‘नवे पर्व, ओबीसी सर्व’ अशी हाक दिली आहे. तुरुंगात असलेल्या भुजबळांवरील आरोप चुकीचे असल्याचे सांगत नाशकात एकवटलेल्या ओबीसी समाजाने भुजबळांच्या सुटकेची मागणी केली आहे. राज्यात एका बाजूला मराठा मूक मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी जोर धरत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहचवू, नये अशी भूमिका ओबीसी समाजाने मांडली आहे. त्यामुळे हा मोर्चा छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ दिसत असला तरी, सर्वपक्षीय मराठा नेतृत्वाला शह देण्याची ओबीसी संघटनांची ही रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण थांबवावे, अशी मागणी देखील ओबीसी समाजाकडून करण्यात आली.
विजय माल्या ९ हजार कोटींचा घोटाळा करुन पसार झाला त्याच्यावर कारवाई करण्यात अपयश ठरलेले सरकार भुजबळांसोबत सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांनी यावेळी केला. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांवर ८७० कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मूकमोर्चात सहभागी होऊन एकटे पडलेल्या भुजबळांना थोड्या प्रमाणात दिलासा दिला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *