facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / शाळकरी मुलींची आत्महत्या प्रेमप्रकरणातूनच

शाळकरी मुलींची आत्महत्या प्रेमप्रकरणातूनच

पोलीस तपासानंतर दोघांना अटक

मुठा कालव्यात आत्महत्या करणाऱ्या शाळकरी मुलींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या मुलींना विवाहाचे आमिष दाखवून नंतर नकार दिल्याने मुलींनी आत्महत्या के ल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही मुलींसोबत बेपत्ता झालेल्या तिसऱ्या मुलीचा अद्यापही शोध लागलेला नाही.

राहुल विनोद गोफणे (वय १८)आणि सोहेल मुस्तफा शेख (वय २१,दोघेही रा. कासेवाडी, भवानी पेठ)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लुकमान मोहरम शेख (वय ४९,रा.कासेवाडी, भवानी पेठ) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कासेवाडी भागातील अबेदा लुकमान शेख (वय १३), श्रुती दिगंबर वाघमारे (वय १५) आणि मुस्कान इम्तियाज मुलतानी (वय १४) या २९ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी श्रुती आणि अबेदाचे मृतदेह मुठा उजव्या कालव्यात सापडले. दरम्यान बेपत्ता झालेल्या मुस्कानचा पोलीस आणि अग्निशमन दलाकडून शोध घेण्यात येत आहे.

आरोपी गोफणे, शेख आणि मंदार उर्फ बाबू निखिल सोरटे यांचे अल्पवयीन शाळकरी मुलींशी प्रेमसंबंध होते. त्यांनी मुलींना विवाहाचे आमिष दाखवले, तसेच घरातून पळून जाऊन गोळीबार मैदानावर थांबा, असे आरोपींनी मुलींना सांगितले होते. आरोपींनी मुलींना मोबाईलवर तसा संदेशही पाठविला होता. त्यामुळे मुली तेथे जाऊन थांबल्या होत्या. मात्र, तिघे जण तेथे गेले नाहीत. त्यामुळे मुलींनी कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली, असे खडक पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *