facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / साताऱ्यात मराठा मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद, लाखोंचा सहभाग

साताऱ्यात मराठा मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद, लाखोंचा सहभाग

कोपर्डी घटनेचा निषेध आणि अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. ३) सातारा शहरात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंचा जनसागर उसळला. सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागातून शेकडो वाहने शहरात दाखल झाली होती. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली. केवळ मोर्चासाठी येणारी वाहने आणि एसटी बसला शहरात प्रवेश देण्यात आला. सातारा जिल्हा परिषद मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्यातील लोक या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हापरिषद मैदान, एसटी स्टॅंडमार्गे गणपत तपासेमार्गे पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएटरपासून मोतीचौक राजपथ मार्गे नगरपरिषद आणि पोवई नाका असा मोर्चाचा मार्ग होता. प्रारंभी जिजाऊ वंदन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चात सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते, माजी खासदार रणजितसिंह मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दिपक चव्हाण  यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मान्यवर क्रांती मोर्चात सहभागी झाले होते. कोपर्डी प्रकरणाचे निषेध फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या व फेटे यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. विविध धार्मिक व स्वयंसेवी संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन, महिलांना, वृध्द, बालकांना पाणी पाऊच देणे, शिस्त ठेवण्यासाठी सूचना देण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सुरक्षेसाठी चार हजार पोलिस तैनात करण्यात आले होते. २० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *