facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / मुंबई / सीसीटीव्हीमुळे मुंबईची सुरक्षा अधिक बळकट

सीसीटीव्हीमुळे मुंबईची सुरक्षा अधिक बळकट

राज्यभरात लवकरच ऑनलाइन ‘एफआयआर’ची सुविधा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

जागतिक दर्जा व उच्चक्षमतेच्या सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने मुंबईची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत होणार असून, वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ऑनलाइन प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची योजना लवकरच राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

षण्मुखानंद सभागृहात मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पार पडला. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची मागणी अनेक वर्षांपासून विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात करण्यात येत होती. आमच्या सरकारने एक वर्षांत संपूर्ण मुंबई शहरात १५१० ठिकाणी ४७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची अंमलबजावणी केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई शहराचा विस्तार लक्षात घेता या शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे, शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यास मदत होणार असल्याचेही मुख्यंमत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. गुन्हेगारांना ओळखण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात यंत्रणा उभारण्यात आल्याने गुन्हेगारांची ओळख पटवून गुन्ह्यंना आळा बसेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

करडी नजर

  • मुंबई शहरात १५१० ठिकाणी ४७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
  • त्यात ३७२७ फिक्स बॉक्स तर ९७० फिरते, २० थर्मल कॅमेरे आणि पाच मोबाइल व्हिडीओ सíव्हलन्स व्हॅन्सचा समावेश.
  • सर्व कॅमेरे फायबर, वायरलेस, व्ही सॅट यांसारख्या अत्याधुनिक नेटवर्क कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यात आले आहेत.
  • सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती साठविण्यासाठी दोन डाटा सेंटर्स तर पोलीस आयुक्तालय, कलिना आणि वरळी अशा तीन ठिकाणी संनियंत्रण कक्ष, १०० पेक्षा अधिक खासगी व सार्वजनिक संस्थांना सीसीटीव्ही यंत्रणेचे साहाय्य देणार असून तेथील व्यवस्थेवरही पोलिसांची नजर राहणार.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *