facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / आकुर्डी – ‘ टाटा मोटर्स’पाठोपाठ ‘बजाज’मध्येही वेतनवाढीचा तिढा
%e0%a4%86%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%80

आकुर्डी – ‘ टाटा मोटर्स’पाठोपाठ ‘बजाज’मध्येही वेतनवाढीचा तिढा

आकुर्डीत कामगारांचे लाक्षणिक उपोषण

उद्योगनगरीतील कंपन्या व व्यवस्थापनातील तंटे वाढत असल्याचे चित्र पुढे आले आहे. टाटा मोटर्ससारख्या मोठय़ा कंपनीत वेतनवाढ करारावरून वर्षभर कामगार व व्यवस्थापनात संघर्ष सुरू असतानाच आता बजाज उद्योगसमूहातही तोच तिढा निर्माण झाला आहे. वेतनवाढ करारासह संघटनेच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगत बजाज ऑटो कंपनीतील विश्वकल्याण कामगार संघटनेने व्यवस्थापनाच्या निषेधार्थ गांधी जयंतीच्या मुहूर्तावर लाक्षणिक उपोषण केले.

संघटनेच्या वतीने अध्यक्ष दिलीप पवार व बाळासाहेब थोरवे यांनी कंपनीचे अध्यक्ष राहुलकुमार बजाज यांना निवेदन पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्यवस्थापन आणि संघटना यांच्यातील नातेसंबंध बिघडले आहेत, ते सुधारण्यासाठी व सुदृढ करण्यासाठी तुम्ही लक्ष घालावे आणि एकत्रित बैठक घ्यावी, असे पत्र दिले होते, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. व्यवस्थापनासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न कामगार करत असताना व्यवस्थापनाचा कामगारविरोधी दृष्टिकोन कायम आहे. सध्या  वेतनकरारासंदर्भात व अन्य सेवा शर्तीबाबत व्यवस्थापनाशी सहा महिन्यांपासून अधिक काळ चर्चा सुरू आहे. ठोस निर्णय मात्र होत नाही. व्यवस्थापन जाणीवपूर्वक उशीर करत आहे. व्यवस्थापनाकडे सुसंवादाचा अभाव असून कामगारांचे प्रश्न सोडवण्याची मानसिकता नाही. संघटना कंपनीच्या ध्येयधोरणांशी पूर्णपणे बांधील आहे. व्यवस्थापनाने दिलेला वेतनवाढीचा प्रस्ताव संघटनेने नाकारला, याचा अर्थ संघटना कंपनीविरोधी नाही. करारास होणाऱ्या विलंबामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. कामगारांचा संयम त्यांचा दुबळेपणा नाही. व्यवस्थापनाच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी संघटनेने एक दिवसीय उपोषण केले. त्यामध्ये चाकण युनिटचे कामगारही सहभागी झाले होते.

Check Also

news-14

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *