facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / जात मनगटात असायला हवी – नाना पाटेकर
nana-patekar

जात मनगटात असायला हवी – नाना पाटेकर

मला आजवर कोणी जात विचारली नाही आणि जात सांगायची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. आपणच आपली जात स्वकर्तृत्वावर निर्माण करायची असते आणि ती मनगटात असायला हवी, असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

शहरी व ग्रामीण भागातील वसाहतींच्या विकासाशी निगडित समन्वय साधणाऱ्या हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पालिकेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘संघर्ष आणि सामथ्र्य  शहरातील श्रमजीवींच्या कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, इनहॅप संघटनेचे अध्यक्ष कीर्ती शहा, पालिका उप आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी या वेळी उपस्थित होते.

जात नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. आपणच आपली जात मनगटातून स्व कर्तृत्वावर निर्माण करायची असते, असे सांगून पाटेकर म्हणाले,की आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते.

झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा हक्क नसतो का? प्रत्येक गोष्ट भांडून का मिळवावी लागते? जगण्याचा आमचा हक्क का नाकारता, असा सवाल त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला केला. पुस्तकाविषयीचे मनोगत कीर्ती शहा यांनी व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक महापौर जगताप यांनी केले.

देशाचे जवानच खरे हिरो

देशापुढे आम्हा कलाकारांची किंमत शून्य आहे. आपल्या देशाचे जवान खरे हिरो असून त्यांचा आदर न करणाऱ्यांचा आदर आपण करु नये. पाकिस्तानी कलाकारांना सध्या काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा काम देण्याचा निर्णय सरकारचा असेल. ज्यांची लायकी नाही, अशांना महत्त्व देऊ नका, असा टोला त्यांनी सलमान खानचे नाव न घेता मारला.

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *