facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पुण्याची आकांक्षा वर्ल्ड चॅम्पियन
2016-10-03aks2_ns

पुण्याची आकांक्षा वर्ल्ड चॅम्पियन

पुणे, दि. 3 – पुण्याची युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणेने कारकिर्दीतील एक मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे.  रशियातील कान्ट-मॅन्सियस्क येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
११ फेरींच्या या स्पर्धेत आकांक्षाने ९ गुणांसह बाजी मारली. अखेरच्या फेरीत  पोलंडच्या स्लिव्हिस्का अ‍ॅलिसावर निर्णायक विजय मिळवून तिने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.  इराणची अ‍ॅलिनासाब मोबिनाला ८.५ गुणांसह उपविजेतेपदावर, तर रशियाच्या शुवालोवा पोलिनाला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताच्याच प्रियांकाने आठवे स्थान प्राप्त केले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *