facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / मराठा मोर्चामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण-राज ठाकरे
raj-thackeray

मराठा मोर्चामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण-राज ठाकरे

मराठा मोर्चामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण

राज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या विराट मोर्चामधील शिस्त कौतुकास्पद असल्याचा एकीकडे उल्लेख करत जातीच्या आरक्षणाला मात्र आपला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे मांडली. आरक्षण या संकल्पनेलाच माझा विरोध आहे. दलितांसह इतर समाजाला आरक्षण आहे. या समाजातील श्रीमंतांना कशाला आरक्षण हवे, असा सवाल करताना प्रत्येक समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागासांना आरक्षण द्या, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा मोर्चामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मतांची भीक मागत फिरत असल्याची टीका करतानाच आपण जातीपातींच्या चिखलात अडकून पडलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालीच तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे, अशी भूमिका आपण मांडणार आहोत, असेही राज यांनी या वेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता.  मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करताना शरद पवार  दिसत आहेत. राज्यात आणि केंद्रात पवारांचे सरकार होते तेव्हा त्यांनी आरक्षण का दिले नाही, असा सवाल राज यांनी केला.

या मोर्चाचा वापर निवडणुकांसाठी तर करून घेतला जात नाही ना, असेही राज या वेळी म्हणाले. आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत?  असा प्रश्न उपस्थित केला.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर शिवसेनेने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. अशी मागणी करण्यापूर्वी तुमची भूमिका जाहीर करा, असे आव्हानही राज यांनी या वेळी शिवसेनेला दिले.

महाराष्ट्रातील दलित समाजातील एका मोठय़ा घटकाला अ‍ॅट्रॉसिटीचे ज्ञान नाही. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेणारे अधिक आहेत. अनेक ठिकाणी एखाद्याला अट्रॉसिटी टाकेन अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *