facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / माणूस म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका-नाना पाटेकर
nana-patekar

माणूस म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारू नका-नाना पाटेकर

पुणे : मी माझ्या उमेदीच्या वयात रस्त्यावरचे झेब्रा क्रॉसिंग रंगवून पैसे कमावले, आणि शिक्षण पूर्ण केले. आपण कुणाला नको आहोत, ही जाणीव अतिशय न्यूनगंड निर्माण करणारी असते. उच्चभ्रू वृत्तीला छेद देणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो का? प्रत्येक गोष्ट आम्हाला भांडून का मिळवावी लागते? माणसे म्हणून जगण्याचा आमचा हक्क नाकारु नका, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी येथे काढले.

हॅबिटॅट फोरम (इनहॅप) या संस्थेने पुणे पालिकेच्या सहकार्याने ‘संघर्ष आणि सामर्थ्य : शहरातील श्रमजिवींच्या कथा’ हे पुस्तक तयार केले आहे. त्याचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते झाले. हमाल पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा, जाणीव संघटना, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत, दगडखाण कामगार विकास परिषद अशा सहा संघटनांच्या सदस्यांच्या संघर्षाची कथा या पुस्तकात आहे.

जात नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. आपण आपली जात निर्माण करायची असते, ती आपल्या मनगटात असते, असे सांगून नाना म्हणाले, सध्या सिग्नलजवळ भिक मागणाऱ्या मुलांना मी मोटारीत घेतो. दुसरा सिग्नल येईपर्यंत त्यांच्या या अवस्थेमागचं कारण समजावून घेतो. आपण आपली दारे कधी उघडणार आहोत? शहरामध्ये जगण्यासाठी येणाऱ्या श्रमिकांना दर्प घाणीचा नसतो, तो श्रमांचा असतो. (प्रतिनिधी)

>पाक कलाकारांंना सध्या काम नको

सर्वात प्रथम देश महत्त्वाचा त्यानंतर आम्ही कलाकार. देशापुढे आमची किंमत शून्य आहे. आपल्या देशाचे जवान हेच खरे हीरो आहेत. त्यांच्याप्रती कोणाला आदर नसेल तर त्यांचा आपण आदर करू नये. सीमेवर युद्ध नसते, तेव्हा तेथे एकमेकांत भाईचारा असतो. युद्ध असल्यावर एकमेकांना गोळ्या माराव्या लागतात. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना आत्ता काम देऊ नये. परिस्थिती निवळल्यावर त्यांनी पुन्हा येण्याबाबतचा निर्णय सरकारचा असेल, असे बजावून पाटेकर यांनी आम्ही बोलतो त्यावर लक्ष देवू नका. तसेच, ज्यांची लायकी नाही अशांना महत्त्वही देऊ नका, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *