facebook
Monday , December 5 2016
Home / मुंबई / मुंबई महानगरपालिका निवडणूक : वॉर्डांची आरक्षणे जाहीर
bmc

मुंबई महानगरपालिका निवडणूक : वॉर्डांची आरक्षणे जाहीर

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या वॉर्डांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. आरक्षण सोडतीच्या पहिल्या फेरीत मुंबईतील १५ वॉर्ड अनुसुचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली होती. आजच्या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच वॉर्डांची उलथापालथ झाली आहे. मुंबई शहरातील ७ वॉर्ड कमी झाले असून उपनगरातील वॉर्डांची संख्या वाढली आहे. यामध्ये जवळपास ८० टक्के नगरसेवकांचे वॉर्ड फुटले आहेत. सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांना याचा फटका बसला आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, मनसेचे संतोष धुरी, उपमहापौर अलका केरकर, भाजपच्या रितू तावडे यांचा समावेश आहे. यामुळे आता या नगरसेवकांना राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.
मागील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी ५३,१२१,१४२,२००,२१० व २२५ हे वॉर्ड महिला ‘एससी’ आणि  ५९ हा वॉर्ड महिला ‘एसटी’ उमेदवारांसाठी राखीव असेल.

Check Also

news-1

दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – दहावीची परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांच्या करिअरमधली अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *