facebook
Saturday , December 3 2016
Home / देश / विदेश / शाहीद आफ्रिदी बरळला ! म्हणे, पाक सीमेचं संरक्षण पठाण करतायत
2016-10-032-clipboard05_ns

शाहीद आफ्रिदी बरळला ! म्हणे, पाक सीमेचं संरक्षण पठाण करतायत

नवी दिल्ली, दि. 3 –  पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं एका क्रिकेटच्या कार्यक्रमात भारताला एक प्रकारे इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या सीमेचं संरक्षण पठाण करत आहेत, असं तो म्हणाला आहे. एका क्रिकेटच्या कार्यक्रमात तो बोलत होता.

आफ्रिदी एका भारतीय वेब पोर्टलला लक्ष्य करत म्हणाला की, भारताला पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देणा-यांच्या संरक्षण फळीबाबत अद्यापही माहिती नाही. पठाणांची एक फळी पाकिस्तानच्या सीमेचं संरक्षण करते आहे. पाकिस्तानच्या सर्व सीमांचे संरक्षण पठाण करत आहेत, असेही तो म्हणाला आहे.

विशेष म्हणजे शाहीद आफ्रिदी स्वतः एक पठाण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाहिदी आफ्रिदीनं भारत आणि पाकिस्ताननं युद्धाऐवजी शांती प्रस्थापित करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं टि्वट केलं होतं. त्यावेळी तो पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असल्याचंही म्हणाला होता.

Check Also

sumitra-mahajan-loksabha-580x393

फक्त टीव्हीवर झळकण्यासाठी खासदारांचा गोंधळ -लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : एकीकडे देशभरात बँक ग्राहकांच्या संयमी रांगा असताना संसदेत मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *