facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / हागणदारीमुक्तीच्या प्रचारासाठी सिन्नर पालिका ‘सैराट’
img-20160930-wa0083

हागणदारीमुक्तीच्या प्रचारासाठी सिन्नर पालिका ‘सैराट’

वाशिम – सैराटची जादू ५ महिने झाली तरी सरलेली दिसत नाही. आज समाजात कोणताही चांगला बदल करायचा असेल तर सैराटकडे पाहिलं जातं. सैराटने आंतरजातीय विवाहांकडे ज्याप्रमाणे सकारात्मकता आणली आहे. तशीच सकारात्मकता इतर गोष्टींमध्ये आणावी असा समाजाचा प्रयत्न आहे. तसाच प्रयत्न वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेने केला आहे. करोडो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री ‘आर्ची’च्या भाषेतील संवाद आता हागणदारीमुक्तीच्या प्रचारासाठी कारंजा नगर पालिकेने वापरणे सुरू केले आहे. कारंजा शहरात ठिकठिकाणी फलक लावून ‘ये रताळ्या… अरं उठ की,’ या भाषेतून हागणदारीमुक्तीचा संदेश दिला जात आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शहरी भागातही हगणदरीमुक्त शहर अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नवनवीन प्रयोग व क्लृप्त्या वापरून प्रचार-प्रसिद्धी करण्याची चढाओढ स्थानिक स्वराज्य संस्थेत लागल्याचे दिसून येते. कारंजा नगर पालिकेने ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री आर्चीच्या भाषेतील संवादावर आधारित ‘म्हण’ तयार केली आहे. शहरात ठिकठिकाणी फलक लावून ‘ये रताळ्या… अरं उठ की, तुला कितीदा सांगितलं, उघड्यावर बसू नको. मराठीत सांगितलेलं कळतं नाही होय.. का इंग्लिश … मध्ये सांगू …! असा आशय लिहून उघड्यावर शौचास न जाण्याचा संदेश दिला जात आहे.
या पोस्टरवरून काही ठिकाणी खिल्ली उजवली जातेय. तर हा विचार ज्या व्यक्तीच्या डोक्यात आला त्याचं कौतुक देखील केलं जातं आहे. सैराट सिनेमा प्रदर्शित झाला आणि एक वेगळी क्रांती घडल्याचं दिसलं. आंतरजातीय विवाहांविरोधात बोलणाऱ्या अनेक लोकांची विचार बदलले. पळून जाऊन लग्न केलेल्या मुला मुलींना सैराट नंतर सन्मान मिळालेला आपण पाहिलं आहे. असं सगळं असताना ही नवी शक्कल किती कामी येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *