facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Crime / आईवडिलांची हत्या लपवण्यासाठी ‘त्याने’ केली आणखी १७ जणांची हत्या

आईवडिलांची हत्या लपवण्यासाठी ‘त्याने’ केली आणखी १७ जणांची हत्या

युनान, चीन:आईवडिलांची हत्या लपवण्यासाठी २७ वर्षाच्या क्रूरकर्मा मुलाने शेजारी राहणा-या तब्बल १७ जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली. या अमानूष कृत्याने चीनमध्ये खळबळ माजली असून त्या माथेफिरु मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
चीनमधील युनान प्रांतातील येमा गावात यांग क्विंगपेई हा २७ वर्षाचा तरुण राहत होता. गावी परतल्यानंतर यांगने त्याच्या आईवडिलांकडे कर्ज फेडण्यासाठी पैशांचा तगादा लावला. आईवडिलांनी नकार देताच यांगने त्यांची हत्या केली. यानंतर आता शेजारी राहणारी लोक आपल्याला पकडतील या भीतीपोटी त्याने शेजारी राहणा-या तब्बल १७ जणांची हत्या केली. यामध्ये तीन लहान मुलांचादेखील समावेश आहे.
हत्याकांडाप्रकरणी पोलिसांना यांगवर संशय होता. तब्बल ३३ तासांच्या शोधमोहीमेनंतर गावापासून १२४ मैलांवर असलेल्या कनमिंग येथून यांगला पोलिसांनी अटक केली. पोलिस चौकशीत त्याने हत्याकांडाची कबुली दिली. मृतांमध्ये सहा कुटुंबातील १७ जणांचा समावेश आहे. यात १० पुरुष आणि ७ महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह गावातल्या विविध ठिकाणी आढळले होते. या सामूहिक हत्याकांडाने चीनमध्ये खळबळ माजली असून चीनमधील सोशल मीडियामधूनही या हत्याकांडाचा निषेध होत आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *