facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Manoranjan / Box Office / ‘धोनी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ‘सेंच्युरी’कडे वाटचाल

‘धोनी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ‘सेंच्युरी’कडे वाटचाल

04 ऑक्टोबर : आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा आला की प्रेक्षकांना तो आवडतो.. ‘एम एस धोनी- द अन्टोल्ड स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतोय. भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरच्या या सिनेमाने पहिल्या विकेन्डला तब्बल 74.51 कोटींची कमाई केलीये.

सुशांत सिंग राजपुतची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा या वर्षी ‘सुलतान’नंतर सर्वाधिक ओपनिंग विकेन्डच्या कमाईत दुस•या क्रमांकावर आहे. शुक्रवारपासून या सिनेमाची घोडदौड सुरू आहे. शुक्रवारी सिनेमाचं कलेक्शन 21.30 कोटी रुपये झालं, तर शनिवारी 20.60 कोटी रुपये आणि रविवारी 24.10 कोटी रुपये ओपनिंग झालं. विकेन्डला प्रचंड कमाई करणा•या या सिनेमानं सोमवारी 8.51 कोटी रुपये कमावले. आता लवकरच एमएस धोनी 100 कोटींच्या क्लबमध्ये येणार असं दिसतंय.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *