facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / नोकियाचा D1c या स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घ्या

नोकियाचा D1c या स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घ्या

स्मार्टफोन बेंचमार्क साइट गीकपेंचवर Nokia चा एक नवा एंड्रॉयड स्मार्टफोन उपलब्ध आहे. गीकबेंचने Nokia D1C हा स्मार्टफोनचे फिचर्स साइटवर उपलब्ध केले आहे. एंड्रॉयड ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या दमदार स्मार्टफोनमध्ये 1.4 GHz ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम देखील आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, हा स्मार्टफोन बजेट कॅटेगिरीत फ्लॅगशिप किलर आहे. तसेच हा स्मार्टफोन फक्त ९००० रुपयांत उपलब्ध झाला आहे.

Untitled-1 (11)

जेव्हा या वेबसाइटवर Nokia D1C टेस्टचे अनेक रिझल्ट आहेत. ज्यामध्ये या स्मार्टफोनने सिंगल कोर टेस्टमध्ये ६८२ स्कोर दिला आहे. मल्टीकोर टेस्टमध्ये याचा स्कोर ३२९९ आहे. ऑगस्टमध्ये नोकियाचे दोन स्मार्टफोन नोकिया ५३२० आणि नोकिया १४९० चा गीकबेंचवर स्पॉट केला आहे. आणि आता हा बेंचमार्क साइट गीकबेंचवर नवीन नोकिया स्मार्टफोन स्पॉट केला आहे. ज्याचं नाव D1C.

कसा आहे हे स्मार्टफोन ?
नोकिया D1C हा स्मार्टफोन एक मिडरेंज स्मार्टफोन आहे. बेंचमार्क साइटच्या माहितीनुसार यामध्ये 1.4 GHz ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम दिला आहे. तसेच नोकिया डिवाइस एंड्रॉयड ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टम आहे. नोकिया पुन्हा एकदा बाजारात येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये एक उत्सुकता आहे. नोकियाने या अगोदर N1 टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबला बाजारात चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. याच टॅबमुळे नोकिया पुन्हा एकदा बाजारात आपलं स्थान निर्माण करू शकला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *