facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / मराठवाड्यात एक लाख घरे, ९ हजार कोटींचे सिंचन प्रकल्प उभारणार- मुख्यमंत्री

मराठवाड्यात एक लाख घरे, ९ हजार कोटींचे सिंचन प्रकल्प उभारणार- मुख्यमंत्री

मराठवाड्यामध्ये तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यावर विविध योजनांची खैरात केली आहे. मराठवाड्याच्या विकासाला गती मिळावी व येथील प्रश्नांना दिशा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी विविध विकासकामांबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मराठवाड्यात एक लाख घरे बांधणे, अहमदनगर-बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करणे, लातूर, जालना येथे आभियांत्रिक महाविद्यालय उभारणे, जालन्याला सीड पार्क उभारणे, ९ हजार २९१ कोटींच्या सिंचन कामास मंजुरी देणे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याची गरज नसून जिल्हाधिकाऱ्यांची समिती नुकसान ठरवणार असल्याचे सांगत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मराठवाड्यासाठीच्या काही ठळक घोषणा
-मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यासाठी ४८०० कोटींचा निधी
-औरंगाबाद कॅन्सर इन्स्टि्टयूटला १२८ कोटी रूपये
-जालना येथे सीड पार्क उभारणार
-मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनासाठी प्रयत्न
-जागतिक दर्जाच्या इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीची शाखा मराठवाड्यात सुरू करणार
-ग्रीन बटालियन उभारणार
-औरंगाबद विमानतळाची धावपट्टी वाढवणार
-अहमदनगर-बीड रेल्वेचे काम पूर्ण करणार
-मराठवाड्यात रस्त्याचे जाळे उभारणार
-जालना, लातूरमधील तंत्रनिकेतनचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करणार,
-मराठवाड्यातील ७८ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र
-पंतप्रधान पीक योजेंतर्गत चार हजार कोंटींचे नुकसान, मराठवाड्यात घर बांधण्यासाठी आगाऊ कर्ज
-अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकास ४ लाख देणार
-मार्च २०१८ पर्यंत परळी-बीड रेल्वेमार्ग पूर्ण करणार
-गुरूत्वीय लहरीच्या अभ्यासासाठी वेधशाळेची स्थापना करणार
-औरंगाबादला आयटीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एचपी कंपनीबरोबर करार
-उस्मानाबाद येथे असलेल्या शासकीय वस्तू संग्रहालयाचे अद्ययावत वस्तू संग्रहालयात रूपांतर
-२३०० कि.मी.चे राज्य रस्ते, २२०० कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग आगामी तीन वर्षांत, ३० हजार कोटी रूपये केंद्र आणि राज्य मिळून देणार
-पडीक जमीन महसूल विभाग वृक्षरोपणासाठी वनविभागाला देणार

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *