facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / राजेवाडी ग्रामस्थांचा विमानतळास विरोध

राजेवाडी ग्रामस्थांचा विमानतळास विरोध

आवाज न्यूज लाईन

पुणे : पुरंदर तालुक्यातीला विमानतळाला राज्य सरकारने मंजुरी दिली असली, तरी राजेवाडी येथील ग्रामस्थांनी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात राजेवाडीच्या ग्रामसभेत तसा ठरावही मंजूर करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, पारगाव मेमाणे या भागाची ‘एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एआयआय) पाहणी केली. त्यानंतर तालुक्याचा विकास होण्याच्या कल्पनेने तालुकावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, राजेवाडी येथील ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला आहे. विमानतळासाठी चार ते सहा किलोमीटरपर्यंतची जागा जाणार असल्याने, तेथे ‘रेड झोन’ होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध वाढला आहे, असे राजेवाडी ग्रामपंचायतीच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘जमीन संपादित केल्यानंतर ग्रामस्थांचे पुनर्वसन सरकार व्यवस्थित करीत नाही. त्यासाठी एकजुटीने लढा देऊन विरोध केला जाईल,’ असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरीभाऊ हिंगणे यांनी सांगितले. ‘आतापर्यंत जेथे विमानतळ झाला, तेथील लोक त्रासले आहेत. त्यामुळे राजेवाडीतील एक इंच जमीनही विमानतळासाठी देणार नाही,’अशी ठाम भूमिका माजी उपसरपंच नामदेव जगताप यांनी घेतली.
‘विमानतळासाठी २४०० हेक्टर जागा आवश्यक असल्याने राजेवाडीची सुपीक जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिढीजात असलेले क्षेत्र विमानतळासाठी गेले तर, पुढील पिढीसाठी काहीच शिल्लक राहणार नाही,’ असे मत प्रगतशील शेतकरी विलास कडलग यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांचा विमानतळासाठी असणारा विरोध वाढत असल्याचे सरपंच पुष्पांजली बधे यांनी नमूद केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *