facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / राणा दग्गुबतीचा ‘बाहुबली’ लूक

राणा दग्गुबतीचा ‘बाहुबली’ लूक

बई, दि. 4 –  बाहुबलीच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच चित्रपटाचा लोगोही रिलीज करण्यात आला होता. चित्रपटात भल्लाल देवची व्यक्तिरेखा साकारणारा राणा दग्गुबती शरिरयष्टीवर प्रचंड मेहनत घेत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राणा आपली शरिरयष्टी दाखवताना दिसत असून त्याने घेतलेली मेहनत दिसत आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.
हा सिनेमा 28 एप्रिल 2017 रोजी बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘बाहुबली’चा हा सिक्वेल असून कटप्पाने बाहुबलीला का मारले?, या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली-दी कनक्ल्युझन’ सिनेमातून मिळणार आहे.
बाहुबली 2′ चित्रपटाने प्रदर्शित होण्याआधीच नवे रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून एक वर्ष बाकी असतानाही चित्रपटाने अगोदरच बक्कळ कमाई केली आहे. एकीकडे चित्रपट रिलीज झाल्यानंतर कोटींचा टप्पा कधी पार होणार याची वाट पाहिली जात असताना बाहुबलीने मात्र प्रदर्शनाआधीच 350 कोटींची कमाई केली आहे. वितरण हक्कांमधून बाहुबलीने कोटींची कमाई करत चित्रपटाला अगोदरच सुपरहिट करुन टाकला आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील वर्षी मिळणार आहे. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे.  ‘बाहुबली : द कन्लूजन’ या नावाने हा चित्रपट असून २८ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. बाहुबली हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत जोरदार कमाई केली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला होता.

अर्का मिडिया वर्क्‍सच्या बॅनरखाली ‘बाहुबली -२’ या चित्रपटाची निर्मिती होणार असून यामध्ये अभिनेता प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया प्रमुख भुमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस.राजमौली करत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *