facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / रॉस टेलरकडून भर सामन्यात हिंदीत शिवी!

रॉस टेलरकडून भर सामन्यात हिंदीत शिवी!

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता कसोटीत १७५ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतीय संघाने ही कसोटी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेऊन मालिका खिशात टाकली आहे. कोलकाता कसोटीच्या तिसऱया दिवशी सामना रंगतदार स्थितीत होता. भारतीय संघाने पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेतल्याने न्यूझीलंडच्या संघाला दुसऱया डावात भारतीय धावसंख्येला लगाम घालणे बंधनकारक होते. भारतीय संघाचे पहिले दोन फलंदाज देखील झटपट बाद झाले होते. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला हुरूप आला होता. कर्णधार विराट कोहली बाद झाल्याच्या न्यूझीलंड संघाच्या अपीलवर पंचांनी नकार दिल्यानंतर मैदानात घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विराट कोहली पायचीत झाल्याच्या न्यूझीलंडच्या अपीलवर पंचांनी नकार दिल्यानंतर किवींचा कर्णधार रॉस टेलर भलताच संतापला. संताप अनावर झालेल्या टेलरने भर मैदानातच शिवी घातली आणि तीही हिंदीत. त्यामुळे रॉस टेलरकडे सर्वांचे लक्ष गेले. अगदी विराट कोहली देखील रॉस टेलरकडे आश्चर्याने पाहू लागला आणि एरवी मैदानात आक्रमक असणारा विराट कोहली हा रॉस टेलर याला हिंदीत शिवी देताना पाहून हसू लागला. रॉस टेलरने तब्बल दोन वेळा हिंदीत शिवी देऊन पंचांच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली होती

कोलकाता कसोटीत रॉस टेलरने दिली शिवी-

rosstaylorabusegif_1475498377
रॉस टेलरच्या संतापावर विराट कोहलीची प्रतिक्रिया-

kohliabusereactiongif_1475498384

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *