facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / Featured / शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज; धावपळीत पोलिसाचा मृत्यू, कारण अस्पष्ट

शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज; धावपळीत पोलिसाचा मृत्यू, कारण अस्पष्ट

औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आपल्या न्याय मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या शिक्षकांना पोलिसांनी दंडूक्याचा प्रसाद दिला आहे. या घटनेचा शिक्षक संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. पोलिस लाठीचार्जमध्ये 18 शिक्षक जखमी झाले आहेत. याबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. दरम्यान, शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज करताना झालेल्या धावपळीत एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
काय झाले नेमके
क्रांतीचौकातून निघालेला मोर्चा आमखास मैदानापर्यंत पोहोचल्यानंतर काही शिक्षकांनी सरकारविरोधी आणि शिक्षणमंत्री तावडे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. मोर्चा नियोजित ठिकाणी जाण्याऐवजी जामा मशिदीसमोर डॉ. आंबेडकर मार्गावर शिक्षकांनी अचानक रास्तारोको आंदोलन सुरु केले. मोर्चेकरी रस्त्यावर ठिय्या देऊन बसले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. जवळपास अर्धातास पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले मात्र आक्रमक शिक्षक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इंग्रज बरे होते…
– इंग्रज बरे होते असे म्हणण्याची वेळ या सरकारने आणली आहे. आधी सरकारने पोटावर मारले आता पोलिसांनी पाठीवर मारले आहे. ही तत्परात कोपर्डी आणि इतर बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लावली असती तर अधिक चांगले झाले असते अशा संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.
– शिक्षकांचे आंदोलन शांतता मार्गाने सुरु होते. ज्या ठिकाणी शिक्षकांनी रास्तारोको केला, तिथे एक दगडही नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दगडफेकीचा केलेला आरोप निराधार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
– मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याबद्दल शिक्षकांनी शोक व्यक्त केला.
अनेक शिक्षक घाटीमध्ये उपचार घेत आहेत.
– महिला शिक्षकांनाही पोलिसांनी सोडले नाही, असे शिक्षक नेत्यांनी सांगितले.
मराठवाड्यात 9291 कोटींचे सिंचन प्रकल्प, अतिवृष्टीची भरपाई पंचनाम्याशिवाय
दरम्यान, तब्बल आठ वर्षांनंतर औरंगाबादेत झालेल्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्याही विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली नाही, मात्र राज्य सरकारने मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 9291 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते भरून काढण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. अतिवृष्टीमुळे पंचनाम्याची गरज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रधानमंत्री आवास योजनेत मराठवाड्यात एक लाख घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. दीड लाखांचे घर आणि अधिक लागल्यास 70 हजारांचे कर्ज देण्याची तरतूद यात करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीतील काही प्रमुख निर्णय
> जालना लातून या दोन ठिकाणी तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयात रुपांतर करणार.
> डॉ. बाबासाहेब आंबेकर विद्यापीठात लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्था सुरू करणार. 150 कोटींचा निधी
> औरंगाबादमध्ये सर्व सरकारी कार्यालये एकत्र असावीत यासाठी 40 कोटी खर्चून प्रशासकीय भवन तयार करण्याचा निर्णय.
> औरंगाबाद मिटमिटा येथे प्राणीसंग्रहालयासाठी 85 एकर जमिन देण्याचा निर्णय.
> इन्स्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) च्या शाखेसाठी मौजे शिरसवाडी येथे 200 कोटींची जागा देण्याचा निर्णय.
> मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय रुजवण्यासाठी मत्यबीज पुरवले जाणार.
औरंगाबादच्या कॅन्सर इन्स्टीट्यूटला स्टेट कॅन्सर इन्स्टीट्यूटचा दर्जा देणार. 120 कोटींचा खर्च करणार.
> उस्मानाबादेत शासकीय वस्तू संग्रहालयाची नवीन इमारत तयार करण्याचा निर्णय.
> औरंगाबादचा स्मार्टसिटीत समावेश झाल्याने भौतिक सुविधांसाठी एक हजार कोटींचा निधी
> 500 कोटी केंद्र सरकार आणि 500 कोटी राज्य सरकार देणार. महानगरपालिकेचा बोझा राज्य सरकार उचलणार.
> फळबागांचे अनुदान दुप्पट करून 25 हजार हेक्टरवर फळबागा फुलवणार
> नांदेड, बीड सारख्या महत्त्वाच्या शहरांत पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देणार.
> जालन्यात रेशीम कोषच्या बाजारपेठे विकसित करणार.
> युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत औरंगाबादच्या समावेशासाठीची पावले उचलणार.
> औरंगाबाद विमानतळावर धावपट्टी विस्तारिकरणाला मान्यता, राज्य सरकार खर्च उचलणार.
> आगामी तीन वर्षांत. 2300 कि.मी.चे राज्य, 2200 कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग
> 5326 कोटी रूपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता, मार्च 2019 पर्यंत बीडला रेल्वे पोहोचवणार

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *